एक्स्प्लोर
दाऊद इब्राहिमवर हास्य चित्रपट बनवणाऱ्या व्यापाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढल्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचे आतापर्यंतच्या पोलीस तपासात समोर आलं आहे.
नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर हास्य चित्रपट बनवणाऱ्या व्यापाऱ्याने गळफास लावून स्वतःची जीवनयात्रा संपवल्याने एकच खळबळ माजली आहे. विनोद रामाणी असे या आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे. ते नागपूरमधील नामांकित औषध व्यापारी होते. सोमवारी दुपारी त्यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढल्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचे आतापर्यंतच्या पोलीस तपासात समोर आलं आहे.
नागपूरच्या इतवारी परिसरात विनोद रामाणी यांचे एपेक्स मेडिकल स्टोर्स शहरातील सर्वात मोठे औषध विक्रीचे दुकान म्हणून ओळखले जाते. शिवाय एपेक्स मेडिकल्सच्या नावाने रामाणी यांचे नागपुरात आणखी पाच दुकानंही आहेत. नागपुरातील एक यशस्वी औषध व्यापारी म्हणून लौकिक असलेल्या रामाणी यांनी त्यांची पत्नी आणि मुलं बाहेरगावी गेले असता 2 ते 3 दिवसांपूर्वी कीर्ती अपार्टमेंट्समधील फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. हळूहळू परिसरात वास पसरला. लोकांनी पोलिसांना बोलावलं तेव्हा विनोद रामाणी यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं.
औषध विक्रीच्या क्षेत्रात प्रचंड यश मिळवलेले रामाणी यांनी आत्महत्या का केली हेच प्रश्न सर्वांचे मनात उभे झाले असताना पोलीस तपासात रामाणी यांच्यावर कर्जाचा मोठा डोंगर होता हे समोर आलं आहे. त्यामुळे त्यांनी हे कर्ज का आणि कोणाकडून घेतले होते असा प्रश्न ही निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2 वर्षांपूर्वी रामाणी यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात ही पाऊल ठेवलं होता. मात्र तो चित्रपट पूर्ण झाल्यानंतर दाऊद इब्राहिमच्या लोकांकडून चित्रपटातील काही सीन्स वगळण्यासंदर्भात रामाणी यांना धमक्या देण्यात आल्या होत्या. त्याची रीतसर तक्रारही त्यांनी पोलिसांकडे दाखल केली होती. नंतरच्या काळात रामाणी यांचा कॉफी विद दाऊद हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यामुळे रामाणी यांना मोठा तोटा झाला होता. तेव्हा पासूनच ते कर्जाच्या चक्रव्यूहात अडकले होते.
विनोद रामाणी औषध विक्रीच्या क्षेत्रात यशस्वी व्यापारी होते आणि त्यांच्या व्यापाराचा व्याप पाहता छोटे मोठे कर्ज ते सहज हाताळू शकत होते. त्यामुळे एकतर त्यांच्यावरील कर्जाचे प्रमाण फार मोठे असावे. किंबहुना त्यांना या कर्ज प्रकरणातून धमक्या दिल्या जात असाव्या अशी शंका आता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा योग्य तपास करत सत्य बाहेर आणावे अशीच अपेक्षा नागपूरच्या व्यापारी वर्गात व्यक्त केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
बुलढाणा
पुणे
Advertisement