एक्स्प्लोर
मिशी कापल्यामुळे तरुणाची न्हाव्याविरोधात पोलिसात तक्रार
नागपुरातील किरण ठाकूर नावाच्या व्यक्तीने न्हाव्याने परवानगीविना आपली मिशी कापली असा आरोप करत त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

नागपूर : मिशी ठेवणाऱ्या पुरुषांसाठी बरेचदा तो 'शान आणि मान'चा विषय असतो. त्यामुळे नाचक्की होण्याची शक्यता असल्यास 'अपनी मुच्छें कटवा दूंगा' असे संवाद चित्रपटात ऐकायला मिळतात. नागपुरात न्हाव्याने मिशी कापल्यामुळे एका व्यक्तीने थेट पोलिसातच तक्रार नोंदवली आहे. नागपूर जिल्ह्यातील कन्हान पोलिस स्टेशनमध्ये हे आगळं-वेगळं प्रकरण आल्यानंतर पोलिसही चक्रावून गेले. किरण ठाकूर नावाच्या व्यक्तीने न्हाव्याने आपली मिशी कापली म्हणून त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. किरण ठाकूर 16 जुलै रोजी कन्हान येथील 'फ्रेंड्स जेन्ट्स पार्लर'मध्ये हेअरकट आणि दाढी करण्यासाठी गेले होते. तेव्हा दाढी करताना चुकून न्हाव्याकडून किरण ठाकूर यांची मिशी कापली गेली. यावरुन आधी किरण ठाकूर आणि न्हाव्यामध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर किरण ठाकूर आणि पार्लरच्या मालकातही वादावादी झाली. अखेर, काल किरण ठाकूर यांनी कन्हान पोलिस स्टेशनमध्ये न्हावी आणि जेन्ट्स पार्लरचा मालक अशा दोघांविरोधात तक्रार दाखल केली. दाढी-मिशी कापल्याबद्दल कोणतं कलम लावायचं असा प्रश्न पोलिसांनाही पडला असावा. अखेर या प्रकरणी धमकी देणे, शिवीगाळ करणे असे अदखलपात्र प्रकरण नोंदवलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र























