नागपूर : राज्यात कोरोनाचा फैलाव पुन्हा एकदा झपाट्याने होताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात काही निर्बंध घालण्यात आले आहेत. नागपुरात कोरोनाचं वाढतं संकट पाहता शहरात पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला देण्यात आले आहेत. नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी ही माहिती दिली आहे.


नागपुरात गेले 5 दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढला आहे. नागपूर शहरात रोज 500 पेक्षा जास्त कोरोना बाधित आढळत आहेत.  त्या पार्श्वभूमीवर महापालिका खडबडून जागी झाली आहे. शहरात पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला देण्यात आले आहेत.


पुण्यात 'या' वेळेत पुन्हा संचारबंदी, शाळा, महाविद्यालयांबाबतही मोठा निर्णय


नववी आणि दहावी या वर्गासाठी परीक्षा घेणे महत्वाचे असल्याने त्यांच्या परीक्षा कोरोना नियमांचे पालन करून घ्याव्या, असं दयाशंकर तिवारी म्हणाले. प्रायव्हेट ट्युशन, क्लासेसच्या ठिकाणी कठोर तपासणी करावी, अशी सूचनाही प्रशासनाला करण्यात आली आहे.


CoronaVirus Lockdown | लॉकडाऊनसंदर्भातील अफवा पसरवाल, तर दंडात्मक कारवाई


दरम्यान, आतापर्यंत हवी तशी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नव्हती, अशी खंत व्यक्त करताना आता कॉन्टेक्ट ट्रेसिंगसाठी आशा वर्करसोबत बोलून ती टीम आम्ही वाढवू असंही महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगिंतलं. त्यामुळे कोरोनाचा 1 रुग्ण सापडल्यानंतर त्या घराच्या चारही बाजूना 10-10 घरांमधील लोकांची चाचणी करण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.. व्यापाऱ्यांनीही त्यांचे कर्तव्य ओळखून विना मास्क खरेदीला येणाऱ्यांना विक्री करू नये, असं आवाहन महापौर तिवारी यांनी केलं आहे.


कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे BMC अलर्ट मोडवर, कारवाईचा धडाका, हजारांहून अधिक इमारती सील


काल एका दिवसात 100 पेक्षा अधिक कोरोना रूग्णसंख्या असलेले जिल्हे

1. मुंबई आणि उपनगर– 897.
2. ठाणे – 551.
3. नाशिक – 276.
4. पुणे – 847.
5. अकोला – 348.
6. अमरावती – 1055.
7. वर्धा – 112.
8. नागपूर – 717.
9. बुलढाणा – 139.
10. औरंगाबाद – 178.