एक्स्प्लोर

नागपुरात वाळूचा अवैध व्यवसाय होणाऱ्या ठिकाणी खुद्द गृहमंत्र्यांचा छापा

खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासह एका वाळू घाटावर छापा मारला. मात्र या छाप्यातून प्रशासनाला फारसे काही साध्य करता आले नाही.

नागपूर : नागपूर जिल्ह्यात वाळूचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांचा उपद्रव खूप वाढला आहे. काल खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासह एका वाळू घाटावर छापा मारला. यावेळी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी ही त्यांच्यासोबत उपस्थित होते. मात्र, मंत्री आणि मोठे अधिकारी छापा मारायला येत आहेत, याची माहिती वाळूचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांना आधीच पोहोचली असावी, त्यामुळे या छाप्यातून प्रशासनाला फारसे काही साध्य करता आले नाही.
गृहमंत्री अनिल देशमुख, नागपूरचे पालकमंत्री आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासमवेत अचानक नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दौऱ्यावर निघाले. यावेळी त्यांच्यासोबत नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त, नागपूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कन्हान, मौदा, पारशिवनी अशा अनेक पोलीस ठाण्यांना भेटी दिल्यानंतर अचानक गृहमंत्र्यांचा ताफा दुपारी 3 वाजता खापा तालुक्यातील राम डोंगरी घाटावर पोहोचला.
नागपुरात वाळूचा अवैध व्यवसाय होणाऱ्या ठिकाणी खुद्द गृहमंत्र्यांचा छापा
या घाटावरून घाटाचा कंत्राट मिळालेला कंत्राटदार मर्यादेपेक्षा जास्त उत्खनन करत शासनाचा लाखो रुपयांचं नुकसान करत असल्याची तक्रार प्रशासनाला मिळाली होती. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः संपूर्ण घाटावर फेरफटका मारत पाहणी केली, तसेच तिथे उपस्थित असलेल्या मजुरांकडून वाळू व्यवसायासंदर्भात माहिती ही घेतली. संबंधित घाटावरून किती वाळू उत्खननाची परवानगी देण्यात आली आहे. कंत्राटदाराने प्रत्यक्षात किती वाळू बाहेर काढली आहे, तसेच घाटावर आता किती वाळू साठवलेली आहे. अधिकाऱ्यांना याचा ताळमेळ घालून या वाळूघाटा संदर्भातला अहवाल लवकर तयार करावा असे  निर्देश गृहमंत्र्यांनी दिले.
दरम्यान, वाळू कंत्राटदार, तिथून वाळूची वाहतूक करणारे ट्रक चालक यांना गृहमंत्री येत असल्याची माहिती आधीच पोहोचली असावी. त्यामुळेच गृहमंत्र्यांचा ताफा तिथे पोहोचण्याच्या आधीच तिथे सर्व काम थांबवले गेले होते. नदीतून अवैधरित्या वाळू उपसणाऱ्या मशीन ही बाहेर काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे छापा घालूनही गृहमंत्र्यांना कुठलीही ठोस कारवाई करता आली नाही अशी चर्चा नागपूर जिल्ह्यात सुरू झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Car Accident : नागपूरच्या अंबाझरी तलावाजवळ भीषण अपघात, भरधाव कार पुलाचे कठडे तोडून थेट नाल्यात कोसळली, गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू
नागपूरच्या अंबाझरी तलावाजवळ भीषण अपघात, भरधाव कार पुलाचे कठडे तोडून थेट नाल्यात कोसळली, गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू
Nagpur Smart City Kiosks: नागपूरला स्मार्ट सिटी प्रकल्पाचा बोजवारा; 65 किऑस्क अक्षरशः भंगारात, कोट्यवधी रुपयांचा चुराडा, काँग्रेसकडून आरोप करत चौकशीची मागणी
नागपूरला स्मार्ट सिटी प्रकल्पाचा बोजवारा; 65 किऑस्क अक्षरशः भंगारात, कोट्यवधी रुपयांचा चुराडा, काँग्रेसकडून आरोप करत चौकशीची मागणी
Nagpur Robbery News : नागपुरात मध्यरात्री धाडसी दरोड्याचा थरार! जालन्याच्या व्यापाऱ्याला लुटलं; कारमधून पावणे 4 कोटींची रोकड पळवली, नेमकं काय घडलं?
नागपुरात मध्यरात्री धाडसी दरोड्याचा थरार! जालन्याच्या व्यापाऱ्याला लुटलं; कारमधून पावणे 4 कोटींची रोकड पळवली, नेमकं काय घडलं?
Parinay Fuke : अखेर परिणय फुकेंनी मौन सोडलं, लेकाच्या कार अपघातावरून हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या गंभीर आरोपांना प्रत्युत्तर, म्हणाले...
अखेर परिणय फुकेंनी मौन सोडलं, लेकाच्या कार अपघातावरून हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या गंभीर आरोपांना प्रत्युत्तर, म्हणाले...

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, 20 मिनिटं हेलिपॅडवर थांबल्यानंर शिंदेंनी मोठा निर्णय घेतला...
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, बॅटरी लो झाल्यानं दुसरं इंजिन सुरु होण्यास, अखेर शिंदेंचा मोठा निर्णय
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
Embed widget