नागपूर : शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असणारे तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेचे आयुक्तपदी येऊन एक महिना पूर्ण झालाय. या एका महिन्यात तुकाराम मुंढे यांनी पालिकेत कामांचा धडाका सुरू केलाय. यात सर्वात महत्वाचं म्हणजे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. कार्यालयीन वेळेच्या आत कार्यालयात येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रमाण 59 टक्क्यावरुन 95 टक्क्यांपर्यंत वाढलंय. विशेष म्हणजे वेळेत कार्यालयात आल्याने समाधान वाटत असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.

जानेवारी महिन्यात सकाळी साडेनऊच्या कार्यालयीन वेळेच्या आत कार्यालयात येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रमाण 59 टक्केच होते. म्हणजेच तेव्हा तब्बल 41 टक्के कर्मचारी उशिरा यायचे. 28 जानेवारीला तुकाराम मुंढे हे महापालिका आयुक्त म्हणून रुजू झाले. आज त्यांना एक महिना पूर्ण झालाय. या एका महिन्यात वेळेत येणाऱ्यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. फेब्रुवारी महिन्यात सरासरीने 95 टक्के अधिकारी, कर्मचारी वेळेत म्हणजेच साडेनऊच्या आधीच कार्यालयात येत आहेत.

जेव्हा फायर ब्रँड अधिकारी तुकाराम मुंढे डम्पिंग ग्राऊंडला अचानक भेट देतात

काही विभागात तर हे प्रमाण 100 टक्के आहे, तर इतर काही विभागात 90 टक्क्यांच्यावर अधिकारी व कर्मचारी वेळेत येत आहे.(सरासरी 95 टक्के आहे ). सकाळी धावपळ करत लगबगीने अधिकारी, कर्मचारी कार्यालय गाठत आहेत. अनेकांची तारांबळ उडत आहे. मात्र, हे अनुशासन चांगले आहे. आम्हालाच बरे वाटत असल्याचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुंढे आल्यानंतर किमान महापालिकेतील प्रशासनात एक शिस्त येत असून साडेनऊ म्हणजे साडेनऊ, हेच नवे घोषवाक्य महापालिकेत ऐकायला येत आहे.

तुकाराम मुंढेंची शाळा, शिवजयंती कार्यक्रमात मोबाईल वाजल्याने जप्त तर जीन्स घातलेल्या कर्मचाऱ्याला झापले

विशेष कार्यक्रमावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांना हजर राहावेच लागेल - मुंढे
मुंढे यांनी काही दिवसांपूर्वी महापुरूषांच्या जयंती वा पुण्यतिथी कार्यक्रमावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांना हजर राहावेच लागेल, असे परिपत्रक काढले होते. त्याचा परिणाम म्हणून सुटी असतानाही अनेक वर्षानंतर महापालिकेत महापुरूषांच्या जयंती कार्यक्रमात मनपा कर्मचारी शिस्तीने हजर होते. यावेळी मुंढे म्हणाले की, कर्त्यव्य प्रत्येक कर्मचाऱ्याने जाणून घ्या. कर्तव्यापेक्षा आपल्या भूमिका महत्वाच्या आहेत. मात्र, आपण भूमिकेपासून दूर आहे. आपल्या भूमिका म्हणजे नागपूरच्या समस्या सोडवणे. नागपूर शहराचा विकास करण्यासाठी, नागरिकांना सुविधा चांगल्या मिळाव्या हे आपले कर्तव्य असावे. मात्र, आपलं कर्तव्य पूर्ण होताना दिसत नाही, असं ते म्हणाले होते.

Nagpur | गुंड संतोष आंबेकरचा अलिशान बंगला जमिनदोस्त, नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढेंची कारवाई | ABP Majha