Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी, सुरक्षेत वाढ
तब्बल तीनवेळा धमकीचा फोन आल्याची माहिती आहे. पहिला कॉल आज सकाळी 11.28 मिनिटांच्या सुमारास आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा जनसंपर्क कार्यालयात पोहोचला असून पुढील तपास सुरु आहे.
Nitin Gadkari Nagpur News : केंद्रीय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. नितीन गडकरी यांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयात तब्बल तीनवेळा हा फोन आल्याची प्राथमिक माहिती आहे. पहिला कॉल आज सकाळी 11.28 मिनिटांच्या सुमारास आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा जनसंपर्क कार्यालयात पोहोचला असून पुढील तपास सुरु आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी साडेअकराच्या सुमारास धमकीचा कॉल आला. यामध्ये काही दाऊद या नावाचाही उल्लेख केल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच कॉलवर मला खंडणी द्या अन्यथा मी सोडणार नाही अशा आशयाची धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. या कॉलनंतर जनसंपर्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी लगेच वरिष्ठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. तसेच पोलिसांचा ताफा तपासासाठी गडकरींच्या कार्यालयात पोहोचला. तसेच सायबर सेललाही या संदर्भात माहिती देण्यात आली असून कॉलबद्दल अधिक तपास सुरु असल्याचेही पोलिस सूत्रांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार गडकरी सध्या नागपुरात असून एका कार्यक्रमात आहेत. हा धमकीचा कॉल आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच त्यांचे निवासस्थान आणि कार्यालयाचीही सुरक्षा वाढविण्यात आली आहे. या धमकीच्या कॉलमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अधिक अपडेट थोड्या वेळात...