कोरोना बाबतीत विदर्भात अजूनही परिस्थिती गंभीर! रुग्णांची आकडेवारी चिंताजनक
देशात कोरोना संक्रमित रुग्णांचे प्रणाण बऱ्यापैकी कमी झाले आहे. मात्र, महाराष्ट्रात त्यातही विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अजून पूर्वपदावर आलेली नाही.
नागपूर : देशात बऱ्यापैकी कोविडचे प्रमाण कमी झाले असले, तरी महाराष्ट्रात अजूनही तुलनेत स्तिथी सुधारली नाही असे म्हणत केंद्रीय पथक राज्यात फिरते आहे. मात्र, त्यातही बघितले तर विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती आणि यवतमाळ ह्या जिल्ह्यात राज्याच्या तुलनेत आकडे बघता स्तिथी थोडी चिंताजनक आहे.
मुंबई शहर हे लोकसंख्येच्या तुलनेत विदर्भाच्या ह्या जिल्ह्यांपेक्षा खूप मोठे. जवळ जवळ 2 कोटींची लोकसंख्या असणाऱ्या मुंबई शहरात रोजचे 400 ते 450 नवीन कोविड रुग्ण नमूद होत आहेत. मात्र, लोकसंख्येने खूप कमी असणाऱ्या विदर्भाच्या ह्या 4 जिल्ह्यात मात्र तुलनेत आकडे आजही खूप जास्त आहेत. केंद्रीय पथकाचे राज्याच्या ठाणे आणि पालघरच्या शहरी भागामधील आणि विदर्भातील ग्रामीण भागात केसेसचा जोर जास्त असल्याचे सांगितले आहे. ज्यामुळे राज्याची टक्केवारी ही देशाच्या टक्केवारीच्या तुलनेत वाढीव आहे.
कसे आहेत हे आकडे?
जिल्हा | गेल्या 3 दिवसाच्या केसेस | मृत्यू | लोकसंख्या (ढोबळ) |
यवतमाळ | 73, 42, 78 | 06 | 13 लाख |
वर्धा | 46, 51, 25 | 03 | 27.72 लाख |
अकोला | 38, 54, 16 | 00 | 22 लाख |
अमरावती | 199, 192, 235 | 01 | 28 लाख |
नागपूर | 288, 268, 360 | 04 | 40 लाख |
विदर्भात बऱ्याच भागात केसेस ह्या राज्याच्या तुलनेत उशिरा दिसल्या. पण राज्यात आकडे साधारणतः कमी होऊ लागले तशी बंधने कमी होऊ लागली. मात्र, नागपूर, अमरावतीत सुद्धा केसेस हव्या तश्या कमी होत नसतानाही बंधने कमी होऊ लागली. एकीकडे ब्रिटनहून आलेल्या नवीन व्हायरसबद्दल आपली चिंता असली, तरी उपराजधानीच्या टास्क फोर्स मधील डॉक्टरांचे मत आहे कि विदर्भाच्या ग्रामीण भागात ब्रिटनहुन न येताही व्हायरस म्यूटेट झाला असावा. मात्र, कमी टेस्टिंग, उशिरा येणारे जीनोम सिक्वेन्सिंगचे निकाल आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध नसलेल्या जीनोम सिक्वेनसिन्गच्या लॅब्स ह्यामुळे ते कळलेले नाही ही शक्यता नाकारता येत नाही.
मुंबईत कोरोना लसीच्या चाचणीसाठी स्वयंसेवक गोळा करण्याच्या कामासाठी दलालांची घुसखोरी विदर्भाला सतर्क राहणे गरजेचे आहे. एकेकाळी इथे 10000 च्या घरात टेस्टिंग होत होते. तिथे आज 25% मोठ्या मुश्किलीने होत आहे. लग्न कार्य, रस्ते, दुकाने सगळीकडेच कोविडची वेगवेगळी बंधने विदर्भात पूर्णतः संपुष्टात आल्याचे दिसते आहे. समाजाला आज शासकीय बंधने उठली असली, तरी आपल्याकडील कोविड अजूनही शाबूत आहे, ह्याचे हरवलेले भान वापस राखणे गरजेचे झाले आहे. कारण, शेकडोतील आकडे हजारात जायला फारसा वेळ लागत नाही हे आपण अनुभवले आहे.