एक्स्प्लोर

INDIA vs NDA : भाजपच्या 'एनडीए'ला 'इंडिया' आघाडी धक्का देणार? चार ते पाच पक्ष संपर्कात असल्याचा काँग्रेसचा दावा

INDIA : एनडीए आघाडीतील काही पक्ष संपर्कात असून लवकरच ते इंडिया आघाडीत दिसतील असा दावा काँग्रेसने केला आहे.

नागपूर:  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा अवधी राहिला असताना सगळ्याच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. तर, भाजपने ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) बैठका सुरू केल्या आहेत. आता एनडीएमधून काही पक्ष बाहेर पडून इंडिया आघाडीत येणार असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. या पक्षांनी एनडीएच्या बैठकीत हजेरी लावली होती. त्यातील पक्ष लवकरच इंडिया आघाडीच्या संपर्कात असल्याचे काँग्रेसने म्हटले. 

काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा यांनी नागपूरमधील पत्रकार परिषदेत दावा केला आहे की भारतीय जनता पक्ष (भाजप) नेतृत्वाखालील एनडीएच्या बैठकीत सहभागी झालेल्या 38 पक्षांपैकी 4-5 पक्ष 'इंडिया' आघाडीच्या संपर्कात आहेत. एनडीएच्या बैठकीत सहभागी होणारे काही पक्ष येत्या काही दिवसांत विरोधी गटात सामील होतील. मुंबईत 1 सप्टेंबर रोजी होणाऱ्या 'इंडिया' आघाडीच्या आगामी बैठकीत काही गोष्टी पाहायला मिळतील. महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलेल्या एनडीएच्या बैठकीत सहभागी झालेल्या 38 पक्षांपैकी काही आता 'इंडिया'मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी सहभागी होतील, असेही शर्मा यांनी म्हटले. 

गेल्या महिन्यात झाली होती एनडीएची बैठक

गेल्या महिन्यात दिल्लीत एनडीएची बैठक झाली होती. या बैठकीत  किमान 38 पक्ष सहभागी झाले होते. या बैठकीला प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. मागील काही वर्षात एनडीए ऐवजी भाजप हे अधिकच अधोरेखित झाले होते. मात्र, 'इंडिया' आघाडीच्या स्थापनेनंतर एनडीएचे महत्त्व भाजपकडून सांगण्यात आले असल्याची चर्चा सुरू झाली. 

महाराष्ट्रात नेतृत्व कोणाकडे?

दरम्यान, तीन पक्षांचा समावेश असलेल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे नेतृत्व काँग्रेस करणार का, या प्रश्नावर शर्मा यांनी थेट उत्तर देणे टाळले. शर्मा यांनी म्हटले की,  "देशाची सद्यस्थिती पाहता नेतृत्व कोण करेल हे महत्त्वाचे नाही, तर आपण सर्व मिळून या अहंकारी सरकारला मजबूत शक्ती म्हणून कसे हटवू शकतो हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले. 

आलोक शर्मा म्हणाले की, कोणीही वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि प्रदेशांमध्ये नेतृत्व करू शकतो. परंतु देशातील सर्वांना एकत्र करण्यासाठी काँग्रेस सर्व राज्यांमध्ये एक मजबूत ताकद म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले. 2024 हे वर्ष 'इंडिया'चे आहे. पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारत ते म्हणाले, पंतप्रधान मोदी हे सीबीआय आणि ईडीला अलीकडील कॅग अहवाल, एनएचएआय आणि आरोग्य विमा क्षेत्रातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश कधी देणार आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Nagpur : नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Embed widget