एक्स्प्लोर

Ajit Pawar: "अजित पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही कामाला लागलो"

आमच्या जागा वाढवण्यासाठी राज्यभर दौरे करतोय, असे मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.


नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत सातत्याने नवनव्या बातम्या येत असतात. कधी त्यांच्या नाराजीच्या बातम्या येत असतात, तर कधी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चा होत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून अनेकदा अजित पवारांची भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी केली जातेय. आता पुन्हा   राज्याचे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram)यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही कामाला लागलो,  असे वक्तव्य केले आहे. आत्राम यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. तसेच आमच्या जागा वाढवण्यासाठी राज्यभर दौरे करतोय, असंही ते म्हणालेत. 

देवेंद्र फडणवीसांचा जुना व्हिडीओ महाराष्ट्र भाजपनं ट्विट केल्यानं राज्याच्या राजकरणात मोठी खळबळ उडाली आहे. मी पुन्हा येईन या संदेशानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तासाभरानंतर ट्वीट डीलिट करण्यात आले आहे. याविषयी बोलताना आत्राम म्हणाले,  भाजपने पुन्हा येईल वाले ट्वीट मागे घेतले आहे.  त्यामुळे मी  या विषयावर बोलणार नाही. मात्र अजित दादा मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही कामाला लागलो आहे. राज्यात जागा वाढवण्यासाठी राज्यभर फिरत आहे. तसेच भाजपने पुन्हा येईनचं ट्विट मागे घेतलंय, त्यामुळे त्यावर भाष्य करणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय. 

अजित पवार लवकरच विदर्भ दौऱ्यावर

आत्राम म्हणाले, अजित पवार लवकरच विदर्भाचा दौरा करणार आहे. जास्तीत जास्त जागा मिळव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. त्यादृष्टीकोनातून आम्ही कामाला सुरूवात केले आहे. अजित पवारांचा प्रशासनावर चांगला वचक आहे त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत या दृष्टीकोनातून तयारी सुरू झाली आहे.

फडणवीस पुन्हा स्टेअरिंग हातात घेणार का?

देवेंद्र फडणवीस लवकरच राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार का या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आलंय. त्यामुळे भाजपच्या या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात दावे प्रतिदाव्यांचा संगम सुरु झाला आहे. शिंदे गटावरील अपात्रतेची टांगती तलवार, महायुतीतील मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा, अजित पवार नाराज असल्याची चर्चा, अजितदादांच्या आक्रमकतेची धार कमी करणं, भाजपच्या कार्यकर्त्यांना नवी उमेद देणं ही कारणं असण्याची चर्चा नाकारता येत नाही. तर भाजपच्या या जुन्या व्हिडीओमुळे नवे प्रश्न उपस्थित झालेत. महाराष्ट्रात सत्तेच्या तीनचाकी रिक्षात, अजितदादांना सोबत घेऊन, मागे बसलेले फडणवीस पुन्हा स्टेअरिंग हातात घेणार का? अशा चर्चांना पुन्हा उधाण आलं  आहे. 

हे ही वाचा :

Devendra Fadanvis : फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? भाजपने ट्वीट केलेल्या व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Chavan : सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Nagpur : नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Embed widget