एक्स्प्लोर

Mohan Bhagwat: OTT वर बीभत्सपणा वाढलाय, कायद्याने नियंत्रण आणा, सरसंघचालकांची मोठी मागणी

Mohan Bhagwat: OTT वर बीभत्सपणा वाढला आहे यावरती कायद्याने नियंत्रण आणावे, अशी मागणी आज आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते नागपुरातील रेशम बाग मैदानावर बोलताना केली आहे.

नागपूर: ओटीटीवर बीभत्सपणा वाढला आहे, ओटीटीवर कंटेट हा सर्वासाठी खुला आहे, याचे काही चांगले वाईट परिणाम समाजात वारंवार दिसून येतात. मात्र, यावर काही निर्बंध असावेत अशा मागणी अनेक वेळेला होते. विजय दशमीच्या मुहूर्तावर संघ मुख्यालय नागपूर येथून आपल्या भाषणावेळी संघ प्रमुख मोहन भागवत यांनी अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले, ज्यामध्ये ओटीटीचाही समावेश होता. ओटीटीसारख्या प्लॅटफॉर्मवर निरुपयोगी गोष्टी येतात. त्यांचा कंटेट इतका घृणास्पद आहे की त्याचा उल्लेख करणे देखील अशोभनीय आहे. ओटीटी सारख्या प्लॅटफॉर्मवर कायदेशीर नियंत्रण असण्याच्या गरजेवर भर देताना ते म्हणाले की, त्यावर कायदेशीर नियंत्रण लादणे अत्यंत आवश्यक आहे. 

“ज्या प्रकारच्या गोष्टी समोर येत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म्स वगैरैंवर ज्या गोष्टी दाखवल्या जातात, ते सांगणंही अभद्र ठरेल इतकं बीभत्स असतं. त्यामुळेच मी म्हणतो की या सगळ्यावर कायद्यानेही नियंत्रण ठेवण्याची खूप गरज आहे. संस्कार भ्रष्ट होण्यामागचं एक मोठं कारण तेही आहे”

ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे वेगवेगळे परिणाम

संघ प्रमुखांनी OTT सारख्या प्लॅटफॉर्मला लोकांमधील मूल्ये नष्ट होण्याचे प्रमुख कारण सांगितले. ते यावर बोलताना म्हणाले, हे देखील एक मोठे कारण आहे ज्यामुळे आज मूल्यांचा ऱ्हास होत आहे. जेव्हा ही मूल्ये जीवनात येतात, तेव्हा त्याचा दुसरा पैलू सामाजिक आणि नागरी जीवनाचा असतो. मूल्यांच्या ऱ्हासाचा प्रश्न आहे, ही मूल्ये तीन ठिकाणी आढळतात. संस्कारांची व्यवस्था पुनर्संचयित आणि मजबूत करावी लागेल.पोटाची खळगी भरण्यासाठी शिक्षण देण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठीही शिक्षण यंत्रणा काम करते.

समाज अशा लोकांना सुशिक्षित मानतो
संघप्रमुख म्हणाले की, जो महिलांना माता मानतो तो सुशिक्षित समजला जातो. तो इतर लोकांच्या पैशाला धूळ समजतो आणि तो केवळ स्वतःच्या कष्टाने आणि योग्य मार्गाने कमावतो. माणसाचे आचरण असे असले पाहिजे की ज्यामुळे इतरांना त्रास होणार नाही. असे वागणाऱ्याला सुशिक्षित म्हणतात.

नवीन शैक्षणिक धोरणात अशी मूल्ये असणाऱ्या शिक्षणपद्धतीनुसार अभ्यासक्रम बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत शिक्षकांच्या उदाहरणाशिवाय हे शिक्षण परिणामकारक ठरणार नाही, त्यामुळे शिक्षकांच्या प्रशिक्षणाची नवी व्यवस्था करावी लागणार आहे.

मोहन भागवत कोलकातातील बलात्कार हत्या प्रकरणावर काय म्हणाले?

एका द्रौपदीचे हरण झाले तर महाभारत घडले. आज  अशा अनेक घटना घडत आहे.  कोलकात्यात रुग्णालयात काय घडले. इतरत्र ही असे घडत आहे. तिथे कोलकातातील समाज डॉक्टर सोबत उभे राहिले. तिथे सरकारकडून आरोपींना संरक्षण देण्याचे प्रयत्न झाले, याबाबत आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी डॉक्टरांनी केली. बंगालच्या ममता सरकार आरोपींना संरक्षण देत असल्याचा आरोपही संघ प्रमुखांनी केला.

"मूल्यांच्या ऱ्हासाचा हा परिणाम आहे की मातृत्वाच्या आचरणाला मान्यता देणाऱ्या आपल्या देशात मातृशक्तीला अनेक ठिकाणी बलात्कारासारख्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. कोलकात्याच्या हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना ही एक लाजिरवाणी घटना आहे. जी संपूर्ण समाजाला कलंकित करतो. संपूर्ण समाज डॉक्टरांच्या पाठीशी उभा आहे, पण असे गुन्हे घडूनही, गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी काही लोकांकडून केलेले घृणास्पद प्रयत्न, गुन्हेगारी, राजकारण आणि वाईट संस्कृती यांची सांगड आपल्याला कशी बिघडवत आहे, हे यातून दिसून येते."

गणेश उत्सवादरम्यान झालेल्या दगडफेकीचा उल्लेख

सीमेवरील राज्यांत सीमेवरील भागात अस्वस्थता निर्माण केली जात आहे. सोबत कट्टरवादी विचारणा खतपाणी घालून असंतोष निर्माण केले जात आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुकर्मामुळे संपूर्ण समाजाला जबाबदार मानून केली जाणारी हिंसा असंतोष नाही, ती गुंडगिरी आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनीही गणेश उत्सवादरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनांचा उल्लेख केला. ते म्हणाले, “अलीकडेच गणेशोत्सवादरम्यान विसर्जनावर दगडफेक झाली, का झाली त्याचे कारण नाही. अशी गुंडगिरी चालू देऊ नये, कुणालाही करू देऊ नये. पोलिसांचे काम संरक्षण करणे आहे, पण त्याआधी आपल्याच लोकांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. मी हे कोणालाही घाबरवण्यासाठी म्हणत नाहीये. अशा परिस्थितीसाठी आपल्याला तयार राहावे लागेल. समाजाने सशक्त, सजग राहणे आवश्यक आहे. दुर्बल राहून चालणार नाही असा पुनरुच्चार यावेळी मोहन भागवतांनी केला आहे."

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Embed widget