एक्स्प्लोर
घरफोडी करुन पळणाऱ्या चोरांचा अपघात, लाखोंच्या मुद्देमालासह चोर पोलिसांच्या हाती
नागपुरातील बेलतरोडी भागात एका घरातून मोठा मुद्देमाल चोरून पळ काढणाऱ्या चोरांचा अपघात झाल्यामुळे हे चोर पोलिसांच्या हाती लागले आहेत.
नागपूर : नागपुरातील बेलतरोडी भागात एका घरातून मोठा मुद्देमाल चोरून पळ काढणाऱ्या चोरांचा अपघात झाल्यामुळे हे चोर पोलिसांच्या हाती लागले आहेत. चोर पकडले गेल्यामुळे चोरीचा लाखोंचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागलाच, शिवाय या दोन सराईत चोरांनी याआधी केलेल्या अनेक घरफोड्यांचा सुगावादेखील लागला आहे. या अपघातामुळे पोलिसांना अनेक घरफोड्यांचा तपास लावणे सोपे गेले आहे. अजय उर्फ अज्जू वरखडे आणि रोशन पाचे अशी या सराईत चोरांची नावे आहेत.
अज्जू वरखडे आणि रोशन पाचे या दोघांनी आतापर्यंत अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने चोरली आहेत. तसेच अनेक घरफोड्यादेखील केल्या आहेत. काल मध्यरात्रीही या दोघांनी बेलतरोडी परिसरात एका बंगल्यामधील लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरला. चोरलेला मुद्देमाल त्याच बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या आय टेन या कारमध्ये ठेवून ती कार घेऊन तिथून पळ काढला.
चोरी करुन पळून जाणाऱ्या चोरांची कार रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांना हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी या चोरांचा फिल्मी स्टाईल पाठलाग सुरु केला. पाठलाग सुरु असताना जयस्तंभ चौकाजवळ चोरांच्या कारचा जबरदस्त अपघात झाला. त्यामुळे लाखोंच्या मुद्देमालासह हे चोर पोलिसांच्या हाती लागले. अधिक तपास केल्यानंतर पोलिसांना समजले की, गेल्या काही दिवसांमध्ये या चोरांनी नागपूरच्या विविध भागात 4 घरफोड्या केल्या आहेत. तसेच दोन वाहनेदेखील चोरल्याची कबुली चोरांनी दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement