Trending : सोशल मीडियावर (Social Media) प्रेरणादायी कथांची कमतरता नाही. कोणताही व्हिडीओ किंवा फोटो सोशल मीडियावर सहज व्हायरल होतो. अनेक जणांना सोशल मीडियावर क्षणार्धात प्रसिद्ध होतात. यामधील काही कथा आपल्या हृदयावर कायमचा ठसा उमटवतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे नागपूरमधील एका 70 वर्षांच्या आजोबांचा. विशेष म्हणजे 70 वर्षांच्या हे आजोबा सायकलवर फिरून पोहे विकताना पाहायला मिळतात. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळतोय. 

Continues below advertisement


एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये, आम्ही रस्त्यावर एक विक्रेता आपली सायकल घेऊन फिरताना दिसत आहे. हे गृहस्थ हसतमुखाने पोहे, चणा-चिवडा विकताना दिसत आहेत .या व्हिडीओमधील व्यक्तीचे नाव आहे. जयंती दादा, जयंती दादा नागपूरचे रहिवासी आहेत. जयंती दादांचा तर्री पोहा बनवतानाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतं आहे. तर्री पोहे बनवताना आजोबा पहिल्यांदा मूठभर तयार पोहे घेतात. मग तो त्यावर मुरमुरा, काळा चणा, मसाला घालून सर्व्ह करतात.



जयंती दादा तर्री पोहे फक्त 20 रुपयांना विकतात. नागपूरच्या रस्त्यावर गांधीबाग आणि इतवारी या परिसरात ते संध्याकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत पोहे विकतात, अशीही माहिती वापरकर्त्याने दिली आहे. त्यानंतर हे आजोबा महाजनवाडी येथे सुरक्षा रक्षक म्हणूनही काम करतात.


महत्त्वाच्या बातम्या :


Gehraiyaan Teaser : Deepika Padukone आणि Siddhant Chaturvediचा किसिंग सीन व्हायरल, पाहा टीजर


Omicron : धोक्याची घंटा! संकटाचा सामना करण्यास तयार राहा - AIIMS संचालक रणदीप गुलेरिया


खड्ड्यांची माहिती देणारं सरकारी अ‍ॅप; रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून नेव्हिगेशन अ‍ॅप लाँच


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha