Road Ministry Launches Navigation App : रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे आपण अनेकदा सरकारला लाखोल्या वाहतो. पण आता सरकारी अ‍ॅपमधूनच खड्ड्यांची माहिती मिळणार आहे.  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं आयआयटी चेन्नईच्या मदतीनं नेव्हिगेशन अ‍ॅप लॉन्च केलं आहे. 'मॅप माय इंडिया' असं या नव्या अॅपचं नाव आहे. या अॅपमधून आता रस्त्यावरचे खड्डे, अपघातप्रवण क्षेत्र,  गतीरोधक, धोकादायक वळणं यांची माहिती मिळणार आहे. या अ‍ॅपचा रस्ते अपघात टाळण्यासाठी मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे. रस्ता सुरक्षा उपक्रमांतर्गत हे अॅप विकसित करण्यात आलं आहे. 


रस्ता सुरक्षा उपक्रमांतर्गत रस्ते अपघात टाळण्यासोबतच अपघात आणि अपघातामुळं होणारे मृत्यू यांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीनं विविध उपायोजना केंद्र आणि राज्य सरकारकडून सातत्यानं केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून वाहनचालकांना प्रवासादरम्यान रस्त्याची अद्ययावत माहिती मिळावी यासाठी 'नेव्हिगेशन अॅप'उपलब्ध करून देण्यात आलं आहे.


पाहा व्हिडीओ : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालायाकडून 'नेव्हिगेशन अ‍ॅप' लॉन्च



केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं लॉन्च केलेलं हे अ‍ॅप नागरिकांना मोफत वापरता येणार आहे. या सेवेचा वापर नागरिक आणि अधिकारी अपघात, असुरक्षित क्षेत्र, रस्ता आणि रहदारी समस्या नोंदवण्यासाठी, प्रसारित करण्यासाठी आणि इतरांना मदत करण्यासाठीही केला जाऊ शकतो. 'मॅप माय इंडिया' या अ‍ॅपवरून प्राप्त झालेल्या डेटाचं आयआयटी मद्रास आणि 'मॅप माय इंडिया'द्वारे विश्लेषण करण्यात येईल. त्यानंतर भविष्यात रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी सरकारही याचा वापर करणार आहे. या अ‍ॅपचं वैशिष्ट्य म्हणजे, वाहनचालकांना प्रवासादरम्यान येणारी अपघात प्रवण क्षेत्रे, स्पीडब्रेकर्स, तीक्ष्ण वळणं आणि खड्डे यांसह इतर धोक्यांबद्दल व्हॉइस आणि व्हिज्युअल हे अ‍ॅप अलर्ट देणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :