Omicron Variant in India : देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. सध्या देशातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या 145 वर पोहोचली आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर एम्सचे (AIIMS)चे संचालक रणदीप गुलेरिया (AIIMS Chief Dr Randeep Guleria) यांनी इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ''भारताला कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी तयार राहावे लागेल.''
 
गुलेरिया यांनी म्हटले आहे की, ''आपल्याला तयारी करावी लागेल आणि आशा करावी लागेल की भारतातील परिस्थिती यूकेमधील परिस्थितीपेक्षा वाईट होणार नाही. आपल्याला अधिक माहितीची गरज आहे. जगात जेव्हा कोरोनारुग्ण वाढतात तेव्हा आपण खूप जागरुक राहून त्यानुसार तयारी केली पाहिजे.''


देशात ओमायक्रॉनचे 157 रुग्ण
देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढून 150 हून अधिक झाली आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे आणखी 6 रुग्ण आढळले आहेत. नवीन ओमायक्रॉनच्या रुग्णांमुळ रविवारी देशातील एकूण ओमायक्रॉनबाधितांची संख्या 157 वर पोहोचली. मुंबईत 31 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे जेणेकरून गर्दी होणार नाही आणि लोक ओमायक्रॉनपासून सुरक्षित आहेत. मुंबईत 19 डिसेंबरपर्यंत ओमिक्रॉनची 18 प्रकरणे समोर आली आहेत.


एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांच्या इशाऱ्याचा अर्थ दिल्लीतील आकडेवारीवरून समजेल कारण दिल्लीत रविवारी कोरोनाचे 107 नवे रुग्ण आढळले आहेत. आकडेवारीत वाढ झाल्यामुळे दिल्लीत कोविड बेड आणि स्वतंत्र हॉस्पिटलची तयारी सुरू झाली आहे. संसर्ग दर 0.17 वर पोहोचला आहे. गेल्या सहा महिन्यांतील हा उच्चांक आहे. दिल्लीत 25 जून रोजी 115 कोरोना रुग्ण आढळले होते, तर 22 जून रोजी संसर्गाचे प्रमाण 0.19 टक्के होते.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha