एक्स्प्लोर

Trains From Nagpur : ख्रिसमसकरिता नागपूरवरुन 30 विशेष रेल्वे गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक...

ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे 30 विशेष गाड्या चालवणार आहे.

Special Trains from Nagpur  : ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे नागपूरहून 30 विशेष गाड्या (Special Trains) चालवणार आहे. पुणे-अजनी साप्ताहिक विशेष (10 सेवा म्हणजेच दहा फेऱ्या): 01443 विशेष गाडी पुण्याहून 6 डिसेंबर सुरु झाली असून ती 3 जानेवारी (5 सेवा) दर मंगळवारी सुटेल आणि 1444 विशेष गाडी काल म्हणजेच 7 डिसेंबर ते 4 जानेवारी (5 सेवा) दर बुधवारी सुटेल. ही गाडी अजनीला 19.50 वाजता सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी 11.35 वाजता पोहोचेल. 

मुंबई-नागपूर साप्ताहिक विशेष (10 फेऱ्या) : 01449 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 6 डिसेंबरपासून सुरु झाली असून ती 3 जानेवारी (5 सेवा) दर मंगळवारी सुटेल. ही गाडी 20.15 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी 10.25 वाजता नागपूरला (Nagpur Railway Station) पोहोचेल. त्याचप्रमाणे 01450 विशेष उद्या म्हणजेच, 9 डिसेंबर ते 7 जानेवारी (5 सेवा) या कालावधीत धावेल. ही गाडी नागपूरहून दर शुक्रवारी 13.30 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनसला दुसऱ्या दिवशी 03.45 वाजता पोहोचेल. पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष (10): 01451 विशेष गाडी कालपासून सुरु झाली असून (7 डिसेंबर) 4 जानेवारी (5 सेवा) दर बुधवारी नागपूरहून सुटेल. ही गाडी 13.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 06.25 वाजता पुण्याला पोहोचेल. 01452 ही स्पेशल गाडी आज, म्हणजेच 8 डिसेंबर ते 5 जानेवारी (5 सेवा) धावणार आहे.

बिलासपूरकडे जाणाऱ्या गाड्या तासनतास उशिरा

नागपूर ते बिलासपूर (nagpur to bilaspur train) जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बिघडले असून पहाटे सुटणाऱ्या नागपूर बिलासपूर या इंटरसिटीसह जवळपास सर्वच गाड्या तासनतास उशिराने चालत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच बिलासपूर ते इतवारी धावणारी इंटरसिटी गाडी देखील उशिरा धावत आहे. यामुळे मार्गातील बिलासपूर, रायपूर, दुर्ग, राजनगाव, डोंगरगढ, गोंदिया येथेही गाड्या उशिरा पोहोचत आहे. मात्र गाड्यांमध्ये सध्या गर्दी नसल्याने नागरिकांना वेळेवरही काढलेले तिकीट कनफर्म मिळत असल्याचा दिसाला मिळत आहे.

नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस 11 डिसेंबरपासून

बिलासपूर-नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्यापूर्वी या एक्सप्रेसचा ट्रायल रन सुरु असल्याची माहिती आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा रेक बुधवारी रात्री गोंदियामार्गे बिलासपूरला पोहोचला. हा रेक इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई येथून बल्लारशाह-गोंदिया मार्गे चालवण्यात आला. रात्री 8.30च्या सुमारास गाडी गोंदियाला पोहोचली असल्याची माहिती आहे. काही काळ थांबल्यानंतर वंदे भारतला बिलासपूरला पाठवण्यात आले. महत्त्वाचं म्हणजे येत्या 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. त्यानंतर प्रवाशांसाठी ही ट्रेन सुरु होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसची ट्रायल रन उद्या, 9 आणि 10 डिसेंबरला बिलासपूर-नागपूर-बिलासपूर दरम्यान होणार आहे.

ही बातमी देखील वाचा

Nagpur News : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 11 डिसेंबरला नागपूर दौरा, मेट्रोतून प्रवास करण्याची शक्यता, प्रशासन लागले कामाला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sambhaji Brigade Pravin Gaikwad attack: संभाजी ब्रिगेडच्या प्रविण गायकवाडांवर नेमका कसा हल्ला झाला? वाचा स्टार्ट टू एंड स्टोरी
संभाजी ब्रिगेडच्या प्रविण गायकवाडांवर नेमका कसा हल्ला झाला? वाचा स्टार्ट टू एंड स्टोरी
Pravin Gaikwad attack: संभाजी ब्रिगेडच्या प्रविण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा अखेर मैदानात उतरला, पहिली प्रतिक्रिया
संभाजी ब्रिगेडच्या प्रविण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा अखेर मैदानात उतरला, पहिली प्रतिक्रिया
शिवसेना धनुष्यबाण वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; उद्धव ठाकरेंनी नाव-चिन्ह आणि वाघासह झेंड्याची मागितली परवानगी
शिवसेना धनुष्यबाण वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; उद्धव ठाकरेंनी नाव-चिन्ह आणि वाघासह झेंड्याची मागितली परवानगी
Actress Exposed Salman Khan: 'सलमान खानसोबतच्या आठ वन-नाईट स्टँडमुळे मी थकलेले...'; एक्स-गर्लफ्रेंडकडून सुपरस्टार भाईजानची पोलखोल
'सलमान खानसोबतच्या आठ वन-नाईट स्टँडमुळे मी थकलेले...'; एक्स-गर्लफ्रेंडकडून सुपरस्टार भाईजानची पोलखोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kashigaon Drugs Case : ब्लड 107 गँगचं ड्रग्स कनेक्शन, पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
Bank Controversy | नाशिक जिल्हा बँक: भुजबळ-कोकाटे वाद, गैरसमजाचा टोला
Ajit Pawar Hinjawadi | वाहतूक कोंडीवर कडक आदेश, 'टायरमध्ये घालून मारा' आणि अंधश्रद्धेवरही बोलले!
Bhandara Bridge Damage | तुफान पावसाने वाहून गेले ४ महिन्यांपूर्वीचे Bridge, निकृष्ट Construction चा फटका
World's Largest Camera | Dr. Kshitija Kelkar यांचा Chile वेधशाळेत समावेश, अवकाशाचा सखोल नकाशा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sambhaji Brigade Pravin Gaikwad attack: संभाजी ब्रिगेडच्या प्रविण गायकवाडांवर नेमका कसा हल्ला झाला? वाचा स्टार्ट टू एंड स्टोरी
संभाजी ब्रिगेडच्या प्रविण गायकवाडांवर नेमका कसा हल्ला झाला? वाचा स्टार्ट टू एंड स्टोरी
Pravin Gaikwad attack: संभाजी ब्रिगेडच्या प्रविण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा अखेर मैदानात उतरला, पहिली प्रतिक्रिया
संभाजी ब्रिगेडच्या प्रविण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा अखेर मैदानात उतरला, पहिली प्रतिक्रिया
शिवसेना धनुष्यबाण वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; उद्धव ठाकरेंनी नाव-चिन्ह आणि वाघासह झेंड्याची मागितली परवानगी
शिवसेना धनुष्यबाण वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; उद्धव ठाकरेंनी नाव-चिन्ह आणि वाघासह झेंड्याची मागितली परवानगी
Actress Exposed Salman Khan: 'सलमान खानसोबतच्या आठ वन-नाईट स्टँडमुळे मी थकलेले...'; एक्स-गर्लफ्रेंडकडून सुपरस्टार भाईजानची पोलखोल
'सलमान खानसोबतच्या आठ वन-नाईट स्टँडमुळे मी थकलेले...'; एक्स-गर्लफ्रेंडकडून सुपरस्टार भाईजानची पोलखोल
Nagpur Crime: नागपूरमधील बड्या नगरसेवकाच्या 'बॉडी बिल्डर' मुलाला ड्रग्ज विकताना अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
मोठी बातमी : नागपूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ; बड्या नगरसेवकाच्या 'बॉडी बिल्डर' मुलाला ड्रग्ज विकताना अटक
Shubhanshu Shukla: शुभांशू अंतराळातून म्हणाले, सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ताँ हमारा; निरोप समारंभात पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मांच्या शब्दाचा पुनरुच्चार; आज पृथ्वीवर परतणार
Shubhanshu Shukla Video: शुभांशू अंतराळातून म्हणाले, सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ताँ हमारा; निरोप समारंभात पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मांच्या शब्दाचा पुनरुच्चार; आज पृथ्वीवर परतणार
Sharad Pawar on Pravin Gaikwad attack: अक्कलकोटमधील हल्ल्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या प्रविण गायकवाडांना शरद पवारांचा  फोन, म्हणाले...
अक्कलकोटमधील हल्ल्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या प्रविण गायकवाडांना शरद पवारांचा फोन, म्हणाले...
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी.... फुलराणी सायना नेहवाल अन् पारुपल्ली कश्यपने नातं संपवलं
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी.... फुलराणी सायना नेहवाल अन् पारुपल्ली कश्यपने नातं संपवलं
Embed widget