एक्स्प्लोर

lampi virus : 'लंपी' उपाययोजनेसाठी जिल्हयाला 1 कोटी, प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजनांवर भर

पशुधनांचे लसीकरण करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला 10 हजार याप्रमाणे लसींचा पुरवठा होणार आहे. ज्या गावातील जनावरांना लम्पी सदृश्य लक्षणे दिसून आली आहेत, तेथील नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात येतील.

नागपूर: पशुधनावरील 'लम्पी' चर्मरोगाचा प्रादुर्भाव नागपूर विभागात आढळून आला असून आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. या आजाराचा फैलाव होऊ नये, यासाठी तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. यासाठी जिल्ह्यांना जिल्हा नियोजन योजनेतून 1 कोटी रुपयाचा निधी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. बाह्यस्त्रोताव्दारे 53 पशुधन पर्यवेक्षकांची पदे भरण्याची कार्यवाही गतीने करावी, असे आदेश अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी दिले.

लसींचा मुबकल साठा उपलब्ध

राज्य शासनाने (State Government) प्रत्येक जिल्ह्याला मुबलक लसी (Vaccine) उपलब्ध करुन दिल्या आहेत. जनावरांवर लक्षणे दिसताच औषधोपचार (Medication) केल्यास जीवितहानी होणार नाही. त्यामुळे गोपालक व शेतकऱ्याने (Farmers) पशुधनाच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावे. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत लम्पी चर्मरोग (skin diseases) प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

पशुधनांचे लसीकरण

पशुधनावरील लम्पी त्वचारोगाचा (lumpy skin disease in cattle) प्रादुर्भाव रोखण्यासाठी संर्सगित क्षेत्रातील पशुधनांचे लसीकरण, गुरांची खरेदी-विक्री बंदी, जनावरांच्या गोठ्यात किटकनाशकांची फवारणी, पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने कराव्यात. पशुधनांचे लसीकरण करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला 10 हजार (every talika 10 thousand vaccine) याप्रमाणे लसींचा पुरवठा होणार आहे. ज्या गावातील जनावरांना लम्पी सदृश्य लक्षणे दिसून आली आहेत, तेथील नमुने तपासणीसाठी (lampi sample testing in pune) पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवावेत. पशुसंवर्धन विभागाने औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा व लक्षणे दिसणाऱ्या गुरांवर तत्काळ उपचार करावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपायुक्त मिलींद कुमार साळवे, आशा पठाण, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पशुपालकांनी घ्यावयाची काळजी?

  • लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्याने प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
  • जनावरांच्या गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.
  • निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
  • गायी आणि म्हशींना एकत्रित ठेवू नये.
  • लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार सुरू करावे.
  • बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता आणि तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
  • बाधित जनावरांचा मृत्यू झाला तर कमीत कमी 8 ते 9 फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.
  • मृत जनावरांच्या खाली आणि वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus Cases Today : सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या घटली, देशात 5 हजार 664 नवीन कोरोनाबाधित

Raj Thackeray: राज ठाकरेंचं आजपासून 'मिशन विदर्भ';  5 दिवस विदर्भ दौरा, नागपुरात जंगी स्वागत

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग! विदर्भासाठी पुढील 15 दिवस महत्वाचे, नेमकी कशी असणार पावसाची स्थिती? हवामान विभागाचा अंदाज काय?
शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग! विदर्भासाठी पुढील 15 दिवस महत्वाचे, नेमकी कशी असणार पावसाची स्थिती? हवामान विभागाचा अंदाज काय?
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis in Nagpur: देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या तरुणीचा पुनर्विवाह, कोरोनामुळे जोडीदार गमावलेल्या तरुणीच्या आयुष्यात नवी पहाट
देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या तरुणीचा पुनर्विवाह, कोरोनामुळे जोडीदार गमावलेल्या तरुणीच्या आयुष्यात नवी पहाट
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget