आज सकाळी काचूरवाही येथील त्यांच्याच मालकीच्या शेतात अशोक वाडीभस्मे यांचे मृतदेह खड्ड्यात पुरलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी अशोक वाडीभस्मे यांच्या हत्येचा गुन्हा नोंदवत आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतले असून तपास केला जात आहे. दरम्यान नागपूर जिल्ह्यात गेल्या सहा दिवसात एकानंतर एक हत्येच्या सहा घटना घडल्या आहेत. यातील काही घटना तर गुन्हेगारांमधील संघर्षातून घडल्या आहेत.
हेही वाचा- नागपुरात स्वयंघोषित 'डॉन'ला पोलिसांनी धडा शिकवला, रस्त्याने 'वरात' काढली
नागपुर जिल्ह्यात सहा दिवसात सहा हत्या
4 जानेवारी : नागपूर शहरातील अजनी परिसरात महेश पोरंडवार यांची डोक्यावर हातोडीने वार करून हत्या. हत्येच्या आरोपाखाली पत्नीला अटक
6 जानेवारी : कन्हान गावात स्थानिक शिवसेना नेत्याच्या नातेवाईकाची गौरव बारमध्ये हत्या. गुन्हेगारी वृत्तीच्या तीन आरोपींनी संजू खडसेला चाकूने भोसकून मारले
7 जानेवारी : नागपूर शहरातील कांजी हाऊस चौकात समीर शेख उर्फ बाबू या गुन्हेगाराची आर के सावजी या हॉटेलमध्ये सर्वांसमोर हत्या. परिसरातील गुन्हेगारांच्या दुसऱ्या टोळीने पाठलाग करुन आणि घेरून हत्या केली
7 जानेवारी : नागपूर शहरातील वाठोडा परिसरात गंगा सेलिब्रेशन हॉल समोर अनोळखी मजुराची काही स्थानिक गुन्हेगारांनी दगडाने ठेचून हत्या केली.
7 जानेवारी : नरखेड गावात विनोद नारनवरे यांना सिमेंट रस्त्यावर डोके आपटून आपटून जखमी केले गेले, नंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.
9 जानेवारी : काचूरवाही गावात शेतामध्ये अशोक वाडीभस्मे यांचे मृतदेह खड्ड्यात पुरलेल्या अवस्थेत आढळले.
संबंधित बातम्या
नागपुरात 'रॅश ड्रायविंग' करणाऱ्या गुंडाची नागरिकांनी मिळून केली हत्या
नागपुरात मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, मित्रांकडूनच तरुणीवर सामुहिक बलात्कार
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात 48 तासात तीन हत्या, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
नागपुरात भर वस्तीत पाठलाग करुन महिला वकिलाची हत्या
नागपुरातील बहुचर्चित भुपेंद्रसिंग हत्याकांडाचा पर्दाफाश, चार कुख्यात गुन्हेगारांना अटक
नागपुरात 'रॅश ड्रायविंग' करणाऱ्या गुंडाची नागरिकांनी मिळून केली हत्या
Nagpur Crime I नागपुरात कारचा हॉर्न वाजवला म्हणून एकाची हत्या