नागपुरात भर वस्तीत पाठलाग करुन महिला वकिलाची हत्या
एबीपी माझा वेब टीम | 14 Apr 2017 09:12 PM (IST)
नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये महिला वकिलाची भर वस्तीत मागे पळून पळून हत्या केल्याची घटना घडली आहे. नागपुरातील गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दित सुरेंद्रगड परिसरात राजश्री टंडन 45 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली. मारेकरी पाठलाग करत असताना राजश्री टंडन यांनी एका दुकानाचा आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या दुकानात घुसून राजश्री टंडन यांची हत्या करण्यात आली. जुन्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नागपुरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ही आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातच अशा प्रकारे हत्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जुन्या वादातून हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.