नागपूर : नागपुरात गेल्या 48 तासात तीन हत्या झाल्याचं समोर आलं आहे. नागपुरात गुन्हेगारांच्या टोळ्यांमधीस संघर्षात प्रतिस्पर्धी गुंडांची हत्या झाली आहे. तर कुठे मित्रा-मित्रांमध्ये वाद होऊन हत्या हत्या झाली आहे. गेल्या 48 तासात अशा घटनेमुळे नागपुरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पहिली घटना : नागपुरात शनिवारी पहाटे एका अल्पवयीन मुलाने आपला 22 वर्षीय मित्र शुभम वासनिक याची तीक्ष्ण शस्त्राने हत्या केली. शुभमने बहिणीच्या घरी नेऊनही सोबत जेवायला न बसविल्याने आरोपी मुलाने शुभमची हत्या केली. ही घटना लकडगंज पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे. घटनेनंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.

VIDEO | नागपुरात 48 तासात तीन हत्या, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह | नागपूर | एबीपी माझा



दुसरी घटना : पार्डी परिसरातील गृहलक्ष्मी नगर परिसरात चंदन उर्फ कालू वर्मा या 22 वर्षीय तरुणाची शनिवारी रात्री राहत्या घरात हत्या करण्यात आली. चंदनच्या शरिरावर तीक्ष्ण हत्याराने तब्बल 21 घाव होते. या प्रकरणी पोलिसांनी अमन गजभिये या आरोपीला अटक केली आहे. दारु पिण्याच्या वादातून ही हत्या करण्यात आली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

तिसरी घटना : गोळीबार चौकाजवळ गुन्हेगारी वृत्तीच्या आणि अनेक अवैध धंदे चालवणाऱ्या अंकित धकाते या गुन्हेगाराची त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी भर रस्त्यात घेरुन हत्या केल्याचं समोर आलं आहे. काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अवैध धंद्यांमधील वर्चस्वाच्या संघर्षातून ही हत्या करण्यात आली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या या हत्या प्रकरणातील सर्व आरोपी फरार आहेत.