एक्स्प्लोर
Advertisement
झाकीर नाईकच्या PRO ला बेड्या, IS मध्ये जाण्यासाठी महिलेचं धर्मपरिवर्तन?
मुंबई: मुस्लीम धर्मप्रसारक डॉ. झाकीर नाईक याची संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) अर्शीद कुरेशीला नवी मुंबईतून अटक करण्यात आली आहे.
अर्शीदवर केरळच्या मरीयम नावाच्या मुलीचं धर्मांतर करुन तिला आयएसमध्ये सहभागी होण्यासाठी पाठवल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली. महाराष्ट्र एटीएस आणि केरळ पोलिसांनी मिळून ही कारवाई केली.
अर्शीदवर केरळमध्ये गुन्हा नोंद आहे. मात्र त्याला आधी नवी मुंबई कोर्टात हजर केलं जाईल. त्यानंतर 25 जुलैपर्यंत त्याला केरळ पोलिसांकडे सोपवण्यात येईल.
मरियमची कहाणी
केरळच्या मरियमची कहाणी धक्कादायक आहे. मरियमला आधी मुस्लिम बनवण्यात आलं. त्यानंतर तिला आयसिसमध्ये ढकलण्यात आलं. यासाठी प्रेमप्रकरणाचं नाटक करण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर मरियमवर झाकीर नाईकच्या भाषणांचा प्रभाव होता, असा आरोप केरळमधील काँग्रेसच्या आमदाराने केला आहे.
बांगलादेश हल्ल्यातील अतिरेक्यांवर झाकीरचा प्रभाव
काही दिवसांपूर्वी बांगलादेशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी हा झाकीर नाईकच्या भाषणांनी प्रभावित होता. त्यामुळे बांगलादेशात झाकीर नाईकच्या पीस टीव्हीवर बंदी घालण्यात आली. याशिवाय भारतातही हा चॅनेल बंद करण्यात आला आहे.
तरुणांची माथी भडकावून, अशांतता निर्माण करत असल्याचा आरोप झाकीरवर आहे.
संबंधित बातम्या
मी शांतीदूत, मात्र युद्धात आत्मघाती हल्ले योग्य : झाकीर नाईक
पीस टीव्हीवर बंदी, तर सुदर्शन टीव्हीवर का नाही: दिग्विजय सिंग
'शेर का बच्चा है, तो स्टुडिओ के बाहर आ', झाकीर नाईकचं आव्हान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
निवडणूक
Advertisement