मुंबई विद्यापीठातील नाट्यशास्त्र विद्यार्थ्यांच्या दिवसभर आंदोलनानंतर योगेश सोमण सक्तीच्या रजेवर
योगेश सोमण यांनी 14 डिसेंबर रोजी फेसबुकवर काँग्रेसचे राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करत एक व्हिडीओ अपलोड केला होता. यांमध्ये त्यांनी राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविरोधात केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या थियेटर ऑफ आर्ट्सच्या संचालकपदी असलेल्या योगेश सोमन यांना मुंबई विद्यापीठाने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. काल रात्री १२ वाजता विद्यार्थ्यांशी चर्चा करून रजिस्टार अनिल देशमुख आणि परीक्षा नियंत्रक विनोद पाटिल यांनी सोमन यांना सक्तीच्या रजेवर पाठवीत असल्याचे जाहीर केले पत्रक काढून जाहीर केले आहे.
काल मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्रचे विद्यार्थ्यांनी नाट्यशास्त्र विभागात असलेल्या गैरसोयी विरोधात आंदोलन केलं. अनुभव नसलेले शिक्षक, विना लेक्चर्स अभ्यासक्रम पूर्ण करणे, कोणतेही सोयीसुविधा नाट्यशास्त्र विभागात नसणे आणि विद्यार्थी विरोधी वातावरण तयार झाल्याने नाट्यशास्त्र विभागात असलेल्या गैरसोयी विरोधात आवाज उठवला. त्यांनंतर अखेर रात्री उशिरा सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे काल दिवसभर नाट्यशास्त्रच्या विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असल्याच पत्र रजिस्ट्रार अजय देशमुख यांनी काढलं.
योगेश सोमण यांनी 14 डिसेंबर रोजी फेसबुकवर काँग्रेसचे राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करत एक व्हिडीओ अपलोड केला होता. यांमध्ये त्यांनी राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविरोधात केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याला एनएसयूआय विद्यार्थी संघटनेने विरोध दर्शविला होता व सोमण यांना तातडीने निलंबित करावे, या मागणीसाठी संघटनेने कुलगुरूंच्या कार्यालयाला टाळे ठोकले होते. यावेळी कुलगुरूंनी संचालकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
मात्र, आश्वासन देऊन सुद्धा कोणतेही कारवाई होत नसल्याने एनएसयुआय, छात्रभारती या विद्यार्थी संघटनांनी हे आंदोलन अधिक तीव्र केलं व सोमण यांच्या निलंबनाची मागणी केली. आता या सगळ्या बाबत विद्यापीठ सत्यशोधक चौकशी समिती नेमणार असून पुढील कारवाईपर्यंत योगेश सोमण हे सक्तीच्या रजेवर असतील. तोपर्यंत इतर फॅकल्टी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविणार असून या समितीचा निर्णय पुढील चार आठवड्यात घेतला जाणार आहे
'नाट्यशास्त्र विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन त्यांच्या मागण्या यासोबतच एनएसयुआयची मागणी या सगळ्याचा विचार या समितीमध्ये केला जाणार असून लवकरच याबाबत निर्णय विद्यापीठकडून घेतला जाणार आहे', असं मुंबई विद्यापीठाचे रजिस्ट्रार अजय देशमुख यांनी सांगितलं आहे.
संबंधित बातम्या :
कोकणासाठी नवं विद्यापीठ स्थापनेसाठी हालचाली सुरु, उच्च-तंत्र शिक्षणमंत्र्यांची माहिती
CAA च्या धर्तीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची राज्यातील शाळांना नोटीस