एक्स्प्लोर

CAA च्या धर्तीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची राज्यातील शाळांना नोटीस

विद्यार्थ्यांचा वापर राजकीय विचार पसरवण्यासाठी होऊ नये, यासाठी राज्यातील शाळांना नोटीस पाठण्यात आली आहे. सीएएच्या धर्तीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय घेतला आहे.

मुंबई : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शाळांना नोटीस धाडली आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा वापर हा राजकीय विचार पसरवण्यासाठी होता कामा नये, असा आदेश देण्यात आला आहे. यावरुन हे निव्वळ राजकारण सुरू असल्याची टीका भाजपने केली आहे. मुंबईतील एका शाळेत सीएए समर्थनावरुन विद्यार्थ्यांनी पोस्टकार्ड लिहिली होती. त्या पार्श्वभूमीवर ही निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. माटुंगा येथील दयानंद बालक विद्यालय आणि दयानंद बालिका विद्यालय या दोन शाळेंच्या मुख्याध्यापकांना शिक्षण उपनिरिक्षकांनी कारणे दाखवा नोटीस धाडली आहे. यात सीएएच्या समर्थनार्थ पोस्टकार्ड लिहिणे आणि सीएएच्या समर्थनार्थ घेण्यात आलेल्या बैठकीबद्दल खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शाळांना नोटीस पाठवली आहे. यात विद्यार्थ्यांचा कोणताही राजकीय विचार पसरवण्यासाठी वापर होता कामा नये, असा आदेश देण्यात आला आहे. फक्त मुंबईच नाही तर राज्यातल्या सर्वच शाळांना हे पत्र पाठवण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्र्यांनी दिली आहे. भाजपची टीका - शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतलेल्या निर्णयावर भाजपने टीका केली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सीएएवरुन केवळ राजकारण सुरू असल्याचे म्हटले आहे. सध्या सीएएवरुन देशभरात वातावरण तापलं आहे. डाव्या संघटना आणि काँग्रेस मित्र पक्षांकडून या कायद्याविरोधात आंदोलने सुरू आहेत. तर, दुसरीकडे भाजपसह उजव्या विचारसरणीच्या संघटना सीएएच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपने आता शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ आणि विविध शैक्षणिक संस्थामध्ये सीएएच्या समर्थनार्थ बैठकांचे आयोजन सुरू केलं आहे. सुधारिक नागरिकत्व कायदा देशभरात लागू - सुधारित नागरिकत्व कायदा 10 जानेवारीपासून संपूर्ण देशात लागू करण्यात आला आहे. यासंदर्भातली अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. या कायद्याला देशात विविध ठिकाणी विरोध सुरुच आहे. अनेक राज्यांनी देखील या कायद्याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन आता आरोप-प्रत्योरोप सुरू झाले आहेत. संबंधित बातमी - CAA Protest | सीएएविरोधावरुन ममतादीदींच्या पश्चिम बंगालमध्ये गरजले मोदी Congress on CAA | सीएए विरोधात काँग्रेसचा मोठा निर्णय | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Padma Award: महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
देशातील पहिला 'पाण्याचा सातबारा' महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट  
देशातील पहिला 'पाण्याचा सातबारा' महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2026 | सोमवार
मी राजीनामा देणार नाही, सुनेत्रा पवारांचे ओएसडी आले होते, पण..; इद्रीस नायकवाडींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
मी राजीनामा देणार नाही, सुनेत्रा पवारांचे ओएसडी आले होते, पण..; इद्रीस नायकवाडींनी सांगितलं नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report
Onion Farmer Crises : गाळला घाम, मिळेना दाम; कांदा उत्पादक रडकुंडीला Special Report
Alandi Mandir Vastav 283 : पैशाचं 'ते' पोतं, माऊलींच्या गाभाऱ्यातील चोरीची कहाणी
Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 RCB vs GT :  बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
Tamil Nadu AIDMK : अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
IPL 2026 : ना विराट, ना रजत पाटीदार आरसीबीचा 'हा' हुकमी एक्का नाही चालला तर बंगळुरुवर मोठं संकट? आकडेवारी काय सांगते?
ना विराट, ना रजत पाटीदार आरसीबीचा 'हा' हुकमी एक्का नाही चालला तर बंगळुरुवर मोठं संकट?
Padma Award: महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
2 लाख ठरले, पण 45 हजारांची लाच घेताना अटक; ग्रामपंचायतमधील महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
2 लाख ठरले, पण 45 हजारांची लाच घेताना अटक; ग्रामपंचायतमधील महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
RCB vs GT Qualifier 1: पावसामुळं क्वालिफायर-1 रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण? बंगळुरु की गुजरात, जाणून घ्या IPL चा नियम 
पावसामुळं क्वालिफायर-1 रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण? बंगळुरु की गुजरात, राखीव दिवस आहे का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2026 | सोमवार
NEET पेपरफुटी, लातूर पॅटर्न, मोटेगावकर; अमित देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी टिपण्णी करावी असे...
NEET पेपरफुटी, लातूर पॅटर्न, मोटेगावकर; अमित देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी टिपण्णी करावी असे...
Embed widget