मुंबई : राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्या मुंबई (Mumbai)येथील सिद्धगड या शासकीय निवासस्थानी वारली चित्रे भिंतींवर रंगविण्यात आली आहेत. ही चित्रे कोणत्याही व्यावसायिक कलाकारांकडून नाही तर आदिवासी पट्ट्यातून येणाऱ्या ग्रामीण महिलांकडून रंगवण्यात आली आहेत. माविमच्या माध्यमातून महिलांना ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिलांच्या या कौशल्याबाबत तसेच त्यांनी काढलेल्या वारली चित्रांबद्दल महिला आणि बालविकास मंत्री ठाकूर यांनी गौरवोद्गार काढले आहेत. महिलांच्या या कलेला शासनाच्या माध्यमातून शक्य तिथे संधी दिली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबई येथील सिद्धगड हे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचे शासकिय निवासस्थान आहे. या निवासस्थानाच्या भिंती आता बोलक्या झाल्या आहेत त्या वारली चित्रांमुळे. या भितींवर रेखाटण्यात आलेली ही चित्रे व्यावसायिक चित्रकारांनी नाही तर ग्राणीण भागातील महिलांच्या एका संस्थेने रेखाटली आहेत. ही चित्रे महिलांनीच रंगवली आहेत. ही चित्रे पाहून यशोमती ठाकूरही भारावल्या. या महिलांच्या या कौशल्याचे त्यांनी कौतुक केले.
राज्यातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. त्यांना विविध क्षेत्रांमध्ये काम करता यावे. यासाठी राज्याच्या महिला आणि बालविकास विभागांतर्गत येणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे प्रयत्न केले जातात. महिला आर्थिक विकास महामंडळाने भिवंडी तालुक्यातील अनगव, अंबाडी. वज्रेश्वरी येथील महिलांना चित्र काढण्याची संधी दिली. याबाबत या महिलांनी मंत्री यशोमती ठाकूर याचे आभार मानले आहे..
या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शिक्षित महिला आणि अशिक्षित आदिवासी महिलांची सांगड घालून असे उपक्रम राबविण्यात येतात अशी माहिती खिडके येथील कशिश जाधव यांनी दिली. वारली चित्रकलेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत असल्याने महिला सशक्तीकरणालाही बळ मिळते आहे. त्यामुळे या महिलांना संधी दे्ण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
Hijab Controversy : कर्नाटकात हिजाबच्या वादानंतर आजपासून महाविद्यालये आणि विद्यापीठे सुरू, अनेक जिल्ह्यांत कलम 144 लागू
Kirit Somaiya : सोमय्यांनी छाती ठोकून सांगितलं, 'वाधवान यांच्याशी सोमय्या कुटुंबाचा दमडीचाही संबंध नाही'
Sanjay Raut : शिवसेना-भाजप वादाचा दुसरा अंक; किरीट सोमय्यांच्या आरोपांनंतर संजय राऊतांकडून प्रश्नांची सरबत्ती