Hijab Controversy  :  कर्नाटकातील हिजाबच्या वादानंतर (karnataka hijab controversy) आता राज्य सरकारने महाविद्यालये (colleges) आणि विद्यापीठे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बीसी नागेश यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यानुसार कर्नाटकमध्ये (karnataka hijab row) आज  11 वी, 12 वी व पदवी महाविद्यालय पुन्हा सुरू झाले आहेत. बेंगळुरूसह अनेक शहरांमध्ये प्रतिबंधात्मक आदेशांदरम्यान ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू होत आहेत, 


अनेक जिल्ह्यांत कलम 144 लागू


कर्नाटकात अनेक जिल्ह्यांत CrPC च्या कलम 144 अन्वये शाळा, प्री-विद्यापीठ महाविद्यालये, पदवी महाविद्यालये किंवा शैक्षणिक संस्थांच्या गेटपासून 200 मीटरच्या परिसरात कोणत्याही प्रकारचा मेळावा, आंदोलने किंवा कोणत्याही प्रकारच्या निषेधाविरुद्ध प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. 16 फेब्रुवारीपासून कनिष्ठ महाविद्यालये आणि पदवी महाविद्यालये पुन्हा सुरू केली जातील,असे शिक्षण मंत्री नागेश यांनी सांगितले. दरम्यान, 14 फेब्रुवारीपासून कर्नाटकात 10 वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  तर हिजाब प्रकरणी राज्याच्या काही भागांमध्ये घडलेल्या अनुचित घटनांनंतर कर्नाटकातील उच्च माध्यमिक शाळा सोमवारी पुन्हा सुरू झाल्या आहेत. कर्नाटकमध्ये हिजावच्या पार्श्वभूमीवर वाद चांगलाच पेटला आहे. अशातच या राज्यातील शाळा आणि महाविद्यालये आठवडाभरासाठी बंद ठेवण्यात आले होते.  मात्र आता कर्नाटक सरकारने आजपासून शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालये टप्प्याटप्प्याने पुन्हा उघडण्यात आली आहेत, या आठवड्याच्या सुरुवातीला इयत्ता 10 वी पर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. तर इयत्ता 11 आणि 12 च्या शाळा तसेच महाविद्यालये आणि विद्यापीठे 16 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होणार आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्यातील शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर, सर्व विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा वादविवाद टाळावा आणि ड्रेस कोडचे पालन करण्यासाठी कॅम्पसमध्ये कोणतीही धार्मिक पोशाख घालू नयेत असे सांगितले.


 


दरम्यान, हिजाब प्रकरण सध्या कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणीसाठी राखून ठेवण्यात आले आहे. यानंतर हिजाब बंदीच्या विरोधात याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाला ड्रेस कोड नियम रद्द करण्याची विनंती केली आहे, कारण यामुळे राज्यातील मुस्लिम मुलींच्या शिक्षणाच्या अधिकाराला बाधा येऊ शकते. यापूर्वी कर्नाटकातील अनेक विद्यार्थ्यांनी हिजाब परिधान केल्यामुळे त्यांना शाळांमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यानंतर निषेध म्हणून त्यांचे वर्ग आणि परीक्षा सोडून दिल्याच्या बातम्या आल्या. सोमवारी शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांचे हिजाब काढण्यास सांगण्याचे व्हिडिओही समोर आले होते


काय आहे प्रकरण?
हे प्रकरण उडुपी येथील एका महाविद्यालयापासून सुरू झाले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सहा मुली हिजाब परिधान करून वर्गात आल्या आणि प्रत्युत्तर म्हणून हिंदू विद्यार्थी भगवे उर्पण घालून महाविद्यालयात आले. हळूहळू हा वाद राज्याच्या इतर भागातही पसरला, त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये तणाव आणि अनेक ठिकाणी हिंसाचार झाला.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha