Sanjay Raut Press Conference : शिवसेना आणि भाजप (BJP) यांच्यात सुरु झालेल्या महायुद्धाचा आज दुसरा अंक पाहायला मिळाला. काल शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी किरीट सोमय्यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. ती पत्रकार परिषद संपून काही मिनिटंही होत नाही तोच संजय राऊतांनी सोमय्यांवर आरोपाचा नवा बॉम्ब फोडला आहे. तसेच पुन्हा एकदा सोमय्या पितापुत्र नक्कीच जेलमध्ये जाणार, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. 


किरीट सोमय्यांच्या आरोपांनंतर संजय राऊतांची प्रश्नावली, म्हणाले उत्तरं द्या 


शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "अलिबागमधले 19 बंगले कुठे आहेत? हा माझा प्रश्न आहे. देवस्थानाच्या जमिनी कुठे आहेत? हा माझा प्रश्न आहे. संजय राऊतांची बेनामी प्रॉपर्टी कुठे आहे, हा माझा प्रश्न आहे. अर्जुन खोतकरांना त्रास का दिला जातोय, हा माझा प्रश्न आहे. भावना गवळी, आनंदराव अडसूळ यांचा गुन्हा काय? , हा माझा प्रश्न आहे. अमोल काळे कुठेय? काय व्यवहार आहे हा? याची उत्तरं द्या." 


पाहा व्हिडीओ : Sanjay Raut : तुम्ही पण त्याच्या नादाला लागू नका, सोमय्या जेलमध्ये जाईल : संजय राऊत ABP Majha



संजय राऊतांचे प्रश्न 



  • अलिबागमधले 19 बंगले कुठे आहेत? हा माझा प्रश्न आहे. 

  • देवस्थानाच्या जमिनी कुठे आहेत? हा माझा प्रश्न आहे. 

  • संजय राऊतांची बेनामी प्रॉपर्टी कुठे आहे, हा माझा प्रश्न आहे. 

  • अर्जुन खोतकरांना त्रास का दिला जातोय, हा माझा प्रश्न आहे. 

  • भावना गवळी, आनंदराव अडसूळ यांचा गुन्हा काय? , हा माझा प्रश्न आहे. 

  • अमोल काळे कुठेय? काय व्यवहार आहे हा? 


ईडीची धमकी देऊन सोमय्यांनी कोट्यवधी जमवले, अधिकाऱ्यालाही 15 कोटी : संजय राऊत 


शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्यावर खळबळजनक आरोप केले. ईडीच्या कारवाईची धमकी देऊन सोमय्या यांनी शेकडो कोटी रुपये जमवले असल्याचा आरोप राऊत यांनी केला. सोमय्या यांनी 15 कोटी रुपये ईडीच्या एका अधिकाऱ्याला दिली असल्याचा सनसनाटी आरोप राऊत यांनी केला. राऊत यांनी पुन्हा एकदा ईडीलादेखील आव्हान दिलं आहे. 


किरीट सोमय्या यांनी ईडी कारवाईची धमकी देऊन मुंबईतील जेव्हीपीडी येथील एक भूखंड बिल्डर असलेला मित्र अमित देसाई याला मिळवून दिला. या भूखंडाची किंमत 100 कोटींहून अधिक आहे. मात्र, ईडी कारवाईची धमकी देऊन सोमय्या यांनी हा भूखंड कमी किंमतीत मिळवून दिला. किरीट सोमय्या यांनी 15 कोटी रुपये ईडीच्या अधिकाऱ्याला दिले असल्याचं राऊत यांनी सांगितलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha