Kirit Somaiya : सोमय्या कुटुंबाचा राकेश वाधवान यांच्याशी कोणताही दमडीचा संबंध नसल्याचे वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे. हे किरीट सोमय्या यांनी छाती ठोकून सांगितले. आम्ही कुठेच काही केलेले नाही. वाधवान आणि निकॉन कंपनीशी सोमय्या यांचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या आरोपाला सोमय्या यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.
त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे असतील तर त्यांनी द्यावीत. त्यांनी पुरावे द्यावेत, आमची चौकशी करावी असेही राऊत यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री तुमचा आहे तुम्ही चौकशी कराअसे ते म्हणाले. निकॉन कंपनी, वाधवान, पीएमसी बँकेशी काहीही संबध नाही असे तेम्हणाले. संजय राऊत टेन्शनमध्ये आले आहेत. मी सांगितलेल्या प्रश्नांची संजय राऊत उत्तरे देत नाहीत. कोवीड सेंटरच्या संदर्भात ते काहीच बोलत नसल्याचे सोमय्या यावेळी म्हणाले. पीएमसी बँकेतून मी पैसा घेतला नाही. पीएमसी बँकेशी आमचा संबंध नाही. पीएमसी बँक घोटाला हा मी बाहेर काढला आहे. तरीही याबाबत संजय राऊत यांच्याकडे कागदपत्रे होती तर त्यांनी ईडीला ही कागदपत्रे द्यायला हवी होती असे सोमय्या म्हणाले.
दरम्यान, निकॉन कंपनी किरीट सोमय्यांची असून राकेश वाधवान त्यांचे पार्टनर असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. मात्र राऊतांचे हे आरोप फेटाळत वाधवान यांच्याशी संबंध नसल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे. किरीट सोमय्या बोलताना म्हणाले की, "आम्ही एक दमडीचीही चूक केलेली नाही. मुद्दा निकॉन कंपनीचा आहे की, आणखी कोणत्या तो नाही. मुद्दा हा आहे की, राकेश वाधवान पार्टनर आहे तो आहे. मी स्पष्टच सांगितलं तसं काहीही नाही." पुढे बोलताना ते म्हणाले की, "व्यावसाय सगळेच करतात. राकेश वाधवान हा प्रश्न आहे, तसं काहीच नाहीये. त्या कंपनीत राकेश वाधवान नाहीत. दूरपर्यंत संबंध नाही." तसेच पीएमसी बँक, राकेश वाधवान आणि माझा, माझ्या कुटुंबियांचा दमडीचा संबंध नाही, असं म्हणत त्यांनी सगळे आरोप फेटाळले आहेत.
तुमच्याकडे जर पुरावे आहेत, कागदपत्रे आहेत तर ती मुख्यमंत्र्यांकडे द्या. नील सोमय्या, किरीट सोमय्या यांची खुशाल चौकशी करा. आम्ही काहीही खोटे केलेले नाही. तुम्ही जे घोटाळे करता ते बाहेर काढणार असल्याचे सोमय्या म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : ईडीची धमकी देऊन सोमय्यांनी कोट्यवधी जमवले, अधिकाऱ्यालाही 15 कोटी; राऊतांचा खळबळजनक आरोप
- Kirit Somaiya : बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरे यांनी भरला, त्यामुळे जोड्यानं कुणाला मारणार? किरीट सोमय्यांचा सवाल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह