एक्स्प्लोर
लैंगिक संबंधांच्या हेतूनं लहान मुलांना स्पर्श करताना जखमा होणं गरजेच नाही: हायकोर्ट
स्पर्शानं पीडतेला जखमा झाल्या नसल्या तरी आरोपीचा गुन्हेगारी हेतू नाकारता येत नाही असं हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे.

Mumbai High Court
मुंबई: लैंगिक संबंधांच्या हेतूनं लहान मुलांच्या खासगी अवयवांना स्पर्श करताना जखमा नाही तरी तो गुन्हाच. पोक्सो कायद्याच्या कक्षेत हे लैंगिक शोषणच आहे असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयानं नुकतात एका प्रकरणात दिला आहे. निव्वळ स्पर्शानं पीडितांना जखम होत नसली तरी गुन्हेगारी हेतू नव्हता हे सिध्द होत नाही. तसेच ते सिद्ध करण्यासाठी जखमा होण्याची आवश्यकता नाही, असंही हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे. वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार जरी अशा जखमा पीडितेला झाल्या नसल्या तरी पोक्सो कायद्याअंतर्गत ते लैंगिक शोषणच आहे. केवळ शारिरीक शोषण हा उद्देश ठेवून केलेला असा स्पर्श हा पोक्सो कायद्याच्या कलम 7 नुसार लैंगिक शोषण ठरतो असं हायकोर्टानं आपल्या निकालात स्पष्ट केलं आहे.
काय आहे प्रकरण?
साल 2013 मध्ये आरोपीनं एका अल्पवयीन मुलीला अशाप्रकारे नकोसा स्पर्श केला होता. याबाबत विशेष न्यायालयाने साल 2017 मध्ये त्याला दोषी ठरवून पाच वर्षे सक्तमजुरीची सजा सुनावली आहे. या शिक्षेविरोधात आरोपीनं मुंबई उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर यावर सुनावणी झाली असता त्यांनी हे अपील फेटाळून लावलं आहे. तसेच आरोपीला पोक्सो सह आयपीसी कलम 354 नुसार मुंबई सत्र न्यायालयानं आरोपीला दोषी ठरवण्याचा निकाल योग्य ठरवत त्याची शिक्षा कायम ठेवली आहे.
पीडीत मुलगी घराबाहेर मैत्रिणीबरोबर खेळत असताना आरोपीनं तिला बाजूला नेऊन हा घृणास्पद प्रकार केला. याबाबत मुलीच्या आईला माहिती मिळाल्यावर तिनं पोलिसांत याची दाखल केली. मुलीच्या वडिलांनी मला वैयक्तिक कारणांमुळे या खोट्या आरोपांत अडकवलं आहे असा बचाव आरोपीच्यावतीनं केला गेला होता. मात्र हा बचाव न्यायालयानं अमान्य करत मुलीनं दिलेली जबानी ग्राह्य मानली होती. मुलगी आणि आईने दिलेला जबाब विश्वासार्ह आहे, असं निरीक्षण हायकोर्टानं आपल्या निकालात नोंदवलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
