एक्स्प्लोर
मुंबईतील हाजी अली दर्ग्यात महिलांना अखेर मझार दर्शन
मुंबई : जवळपास 4 वर्षानंतर महिलांना मुंबईच्या हाजी अली दर्ग्यातील मझारपर्यंत प्रवेश मिळाला आहे. 'हाजी अली सब के लिए फोरम'च्या महिला सदस्यांनी मंगळवारी दर्ग्यातील मझारपर्यंत जाऊन दर्शन घेतलं.
या हक्कासाठी महिलांना कायद्याची मोठी लढाई लढावी लागली. 2012 मध्ये हाजी अली ट्रस्टनं महिलांना मझारपर्यंत जाण्यास मज्जाव घातला. त्यानंतर अनेक मुस्लिम महिला संघटनांनी याविरोधात आवाज उठवला.
हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेलं. न्यायालयानं महिलांना मझारपर्यंत प्रवेश देण्यासंदर्भात निर्णय दिला. मात्र त्यानंतरही महिलांच्या प्रवेशाला विरोध कायम होता. अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर हाजी अली ट्रस्टच्या सदस्यांनी महिलांना प्रवेश देण्याची तयारी दर्शवली. अखेर महिला संघटनेच्या लढ्याला 4 वर्षांनंतर यश मिळालं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement