एक्स्प्लोर
मुंबईत महिलेनं दोन चिमुरड्यांना कारखाली चिरडलं
मुंबई : कफ परेड परिसरातील नेव्ही नगरमध्ये एका महिलेनं दोन लहान मुलांना कारनं चिरडलं आहे. यात दोन्ही चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी महिलेसह तीच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी महिलेचं नाव संगीता असून अपघातावेळी कार चालवण्यास शिकत होती. अपघातावेळी महिलेचे पती लान्सनायक संतोष कुमार राय हे आपल्या पत्नीला कार शिकवत होते. समोरुन सायकलवरुन येणाऱ्या दोन मुलांकडे पाहून या महिलेनं ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबला. त्यामुळे सायकलवरुन येणारी दोन्ही मुलं चिरडली गेली. यात अभय (7) रस्त्याबाहेर फेकला गेला. डोक्याला मार लागल्यानं त्याचा मृत्यू झाला, तर अक्षांशला(12) महिलेनं कारनं फरफटत नेलं.
अपघातानंतर महिलेसह तीच्या पतीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करुन पोलिसांनी जामिनावर सोडलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement