एक्स्प्लोर

मुंबईला तुंबई म्हणून देश आणि जागतिक स्तरावर बदनाम करणार आहात? : नितेश राणे

पावसाळा तोंडावर आला असूनही मुंबईत एकूण 36 टक्केच नालेसफाई पूर्ण झाली आहे. यंदाही मुंबईला तुंबई म्हणून देश आणि जागतिक स्तरावर बदनाम करणार आहात?" असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.

मुंबई : "मुंबईत 386 फ्लडिंग पाईंट आहेत. तिथे पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप देण्यापलीकडे आपण काय केलं आहे? की यंदाही मुंबईला तुंबई म्हणून देश आणि जागतिक स्तरावर बदनाम करणार आहात?" असे सवाल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबई महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारला विचारले आहेत. या संदर्भात नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

मुंबईतील फ्लडिंग पाईंट्स इथे पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावण्याच्या पलिकडे आपण काय उपाययोजना केल्या आहेत? राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन या संवेदनशील मुद्यावर विविध विभागांचे मत लक्षात घेता काही धोरण आखणार आहे का? तिथल्या नागरिकांना अशा संभाव्य आपतीजन्य परिस्थिती काय उपाययोजना करायच्या असतात याविषयी आपण काही जनजागरण केलं आहे का? असे सवाल त्यांनी विचारले आहेत.

आमदार नितेश राणे यांच्या पत्रात काय लिहिलंय?

पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते अशीच मुंबईची ओळख सातत्याने प्रसारमाध्यमे देतात. परंतु या तुंबलेल्या मुंबईत अनेकांनी आपले हकनाक जीव गमावले तरीही त्यावर ठोस उपाययोजना म्हणून मुंबई महापालिकेत दीर्घकाळ सत्ता भोगणारी शिवसेना मात्र काहीही करु शकलेली नाही. मुंबईला नुसती ठेकेदारांच्या फायद्यासाठी रंगरंगोटी आणि देखावा करुन गतवैभव प्राप्त होणार नाही. त्यासाठी जनतेच्या मूळ समस्येकडे पण लक्ष दिले पाहिजे. यावर्षी चांगला पाऊस होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईची काय परिस्थिती असेल याची कल्पना करवत नाही.

तुंबणाऱ्या या मुंबईत 386 असे धोक्याची ठिकाणे आहेत. ज्याला आपण फ्लडिंग पॉईंटस म्हणतो. यापैकी 28 ठिकाणं एकाच पश्चिम विभागतील आहेत. फक्त माटुंगा, वडाळा, सायन भागतच यातील 25 फ्लडिंग पॉईंट्स आहेत. यंदाच्या पावसाळ्यात समुद्राला 22 दिवस भरतीही असणार आहे. त्यामुळे मुंबईत सलग 250 मिलीपेक्षा अधिक पाऊस पडला तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल का काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे. 

पावसाच्या पाण्याचा निचरा या फ्लडिंग पॉईंट्स इथून झाला नाही तर मुंबईकरांना भीषण परिस्थितीला तोंड द्यावं लागेल. या फ्लडिंग पाईंट्स येथे पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावण्याच्या पलिकडे आपण काय उपाय योजना केल्या आहेत? हे आम्हा जनतेस कळाले पाहिजे. 

राज्य सरकार व पालिका प्रशासन या संवेदनशील मुद्यावर विविध विभागांचे मत लक्षात घेता काही धोरण आखणार आहे का? तेथील नागरिकांना अशा संभाव्य आपतीजन्य परिस्थिती काय उपाययोजना करायच्या असतात या विषयी आपण काही जनजागरण केलं आहे का? या सर्व प्रश्नांची आपण समाधान साधणार आहात की नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून देश व जागतिक स्तरावर बदनाम करणार आहात.

मुंबईतील एकूण 36 टक्के नालेसफाई पूर्ण
पावसाळा तोंडावर आला असूनही मुंबईतील नालेसफाईचं काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. मुंबई शहरातील नालेसफाई 18 टक्के झाली आहे. तर पूर्व उपनगरात 44 टक्के आणि पश्चिम उपनगरात 36 टक्के नालेसफाई झाली आहे. मुंबईत एकूण 36 टक्केच नालेसफाई पूर्ण झाली आहे. त्यामुळे मुंबईची यंदाही तुंबापुरी होणार का असा सवाल विचारला जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratan Tata: रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळणार? रतन टाटांच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंचं महत्त्वाचं पाऊल, केंद्राकडे प्रस्ताव पाठवला
रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळणार? रतन टाटांच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंचं महत्त्वाचं पाऊल, केंद्राकडे प्रस्ताव पाठवला
Cidco : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना डावलत धनाढ्य बिल्डरांसाठी सिडकोची लॉटरी? माहिती मिळताच शेतकरी आक्रमक, शिरसाट म्हणाले...
सिडकोच्या संभाव्य लॉटरीला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा विरोध, आंदोलनाचा इशारा, लॉटरी निघणार नाही, संजय शिरसाट यांची भूमिका
Pakistan Media Over Death of Ratan Tata : जगाच्या पाठीवरून रतन टाटांच्या कार्याला सलाम, शेजारच्या पाकिस्तानमध्ये कोणती प्रतिक्रिया उमटली?
जगाच्या पाठीवरून रतन टाटांच्या कार्याला सलाम, शेजारच्या पाकिस्तानमध्ये कोणती प्रतिक्रिया उमटली?
Ratan Tata: अंबानींच्या अँटिलियापेक्षा भारी असलेल्या राजवाड्यासारख्या 'बख्तावर' मध्ये राहायचे रतन टाटा; जाणून घ्या कसं आहे?
अंबानींच्या अँटिलियापेक्षा भारी असलेल्या राजवाड्यासारख्या 'बख्तावर' मध्ये राहायचे रतन टाटा; जाणून घ्या कसं आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah -Ratan Tata : देशातील कायद्याचं पालन करत रतन टाटांनी उद्योग वाढवलाPiyush Goyal On Ratan Tata :पीयूष गोयलयांनी रतन टाटांच्या दानशुरतेचे किस्से सांगितलेRaj Thackeray-Ratan Tata : रतन टाटांचा आठवणीतला व्हिडीओ राज ठाकरेंनी केला पोस्टRatan Tata Passed Away:Supriya Sule Sharad Pawar रतन टाटांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratan Tata: रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळणार? रतन टाटांच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंचं महत्त्वाचं पाऊल, केंद्राकडे प्रस्ताव पाठवला
रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळणार? रतन टाटांच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंचं महत्त्वाचं पाऊल, केंद्राकडे प्रस्ताव पाठवला
Cidco : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना डावलत धनाढ्य बिल्डरांसाठी सिडकोची लॉटरी? माहिती मिळताच शेतकरी आक्रमक, शिरसाट म्हणाले...
सिडकोच्या संभाव्य लॉटरीला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा विरोध, आंदोलनाचा इशारा, लॉटरी निघणार नाही, संजय शिरसाट यांची भूमिका
Pakistan Media Over Death of Ratan Tata : जगाच्या पाठीवरून रतन टाटांच्या कार्याला सलाम, शेजारच्या पाकिस्तानमध्ये कोणती प्रतिक्रिया उमटली?
जगाच्या पाठीवरून रतन टाटांच्या कार्याला सलाम, शेजारच्या पाकिस्तानमध्ये कोणती प्रतिक्रिया उमटली?
Ratan Tata: अंबानींच्या अँटिलियापेक्षा भारी असलेल्या राजवाड्यासारख्या 'बख्तावर' मध्ये राहायचे रतन टाटा; जाणून घ्या कसं आहे?
अंबानींच्या अँटिलियापेक्षा भारी असलेल्या राजवाड्यासारख्या 'बख्तावर' मध्ये राहायचे रतन टाटा; जाणून घ्या कसं आहे?
International Media On Death of Ratan Tata : अद्वितीय उद्योजक ते ब्रिटिश उद्योगाला आकार देण्यात मोठी भूमिका! जगभरातील माध्यमांकडून रतन टाटांच्या कार्याला 'सलाम'
अद्वितीय उद्योजक ते ब्रिटिश उद्योगाला आकार देण्यात मोठी भूमिका! जगभरातील माध्यमांकडून रतन टाटांच्या कार्याला 'सलाम'
Maharashtra Politics: दापोलीत कुणबी भवनाच्या जागेवरुन भाजप आणि शिंदे गट जुंपणार? योगेश कदम-रवींद्र चव्हाण आमनेसामने
दापोलीत कुणबी भवनाच्या जागेवरुन भाजप आणि शिंदे गट जुंपणार? योगेश कदम-रवींद्र चव्हाण आमनेसामने
Ratan Tata : उद्योग विश्वासाठी तहहयात ऋषितुल्य राहिले, पण 'या' तीन वादाच्या प्रसंगामुळे रतन टाटा चर्चेत आले
उद्योग विश्वासाठी तहहयात ऋषितुल्य राहिले, पण 'या' तीन वादाच्या प्रसंगामुळे रतन टाटा चर्चेत आले
Ratan Tata Death: मैनु विदा करो... मुंबईच्या गरब्यातील सळसळती पावलं रतन टाटांसाठी थांबतात तेव्हा, VIDEO व्हायरल
मैनू विदा करो... मुंबईच्या गरब्यातील सळसळती पावलं रतन टाटांसाठी थांबतात तेव्हा, VIDEO व्हायरल
Embed widget