एक्स्प्लोर

'आप' मुंबईत मोफत सुविधा देणार? इतर पक्षांची डोकेदुखी वाढणार

आप दिल्ली आणि पंजाब निवडणुकांप्रमाणेच जाहीरनाम्यात विविध घोषणा करून महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे चित्र आहे त्यामुळे इतर पक्षांची कोंडी होऊ शकते.

मुंबई : शिवसेना, भाजपा,काँग्रेस ,राष्ट्रवादी आणि मनसे  यांच्यात संघर्ष सुरू असताना मुंबईकरांना नवा पर्याय देण्याच्या जोरदार हालचाली आम आदमी पक्षाने सुरू केल्या आहेत. दिल्ली, पंजाबमध्ये सत्ता काबिज केल्यानंतर मुंबईत पक्षाचा विस्तार करून मुंबई महापालिकेत मुसंडी मारण्यासाठी 'आप' चा डाव आहे. त्यातच आप दिल्ली आणि पंजाब निवडणुकांप्रमाणेच जाहीरनाम्यात विविध घोषणा करून महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे चित्र आहे त्यामुळे इतर पक्षांची कोंडी होऊ शकते.

आगामी महापालिकेच्यादृष्टीने कशाप्रकारे काम सुरू आहे यासंदर्भात आप प्रतिनिधीशी संवाद साधला असता, त्यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे मोफत शिक्षण, पाणी, आरोग्याच्या सुविधा देण्याचं सांगितले ते 2015 पासून आतापर्यंत आम्ही देतोय . त्याच धर्तीवर आपण पंजाबच्या जनतेला 300 युनिट वीज मोफत देतोय. त्यामुळे महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुकांमध्ये पालिकांचा अभ्यास करून कशाप्रकारे महाराष्ट्रातील जनतेला त्या महापालिका अंतर्गत  सुविधा मोफत व कमी दरात देता येतील त्याचा अभ्यास आम्ही करतोय. मुंबईत पाणी पट्टी , वीज आणि नागरी सुविधा मोफत देता येतील का हे आम्ही पाहतोय आणि ते आमच्या जाहीरनाम्यात नक्कीच असणार आहेत. याच लोकोपयोगी संकल्पनेवर आम्हाला लोकं प्रतिसाद देतील असे आपचे नेते धनंजय शिंदे यांनी म्हटलंय.

 दिल्ली आणि पंजाबमधील मोफत वीज आणि पाण्याचे मॉडेल, मुंबई महानगरपालिकेत आजमावण्याचा प्रयत्न आम आदमी पक्षाने  सुरू केला आहे. वीज मोफत देणे शक्य नसले तरी मुंबईकरांना पाणी आणि घरपट्टी तसेच अन्य सुविधा मोफत देता येऊ शकतील अशाप्रकारे जाहीरनामा बनवणार असल्याचं आपकडून समजतं.

मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये  सर्वच राजकीय पक्षांनी आपापली ताकद आणि अजेंडा राबवायला सुरुवात केली आहे.आता सर्वच पक्षांचे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून पाहिल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेकडे लक्ष लागले आहे. गेले पंचवीस वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर आपला झेंडा लागावा यासाठी सर्वच पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत. आम आदमी पक्षानेही दिल्ली आणि पंजाबच्या धर्तीवर मुंबईकर मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोफत पाणी आणि अन्य नागरी सुविधा मोफत देण्याबाबत विचार सुरू असून तशा पद्धतीचा दावा आपल्या जाहीरनाम्यात करणार असल्याचे सुतोवाच केले आहे.त्यामुळे या घोषणावर इतर पक्षांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

एबीपी माझाच्या मुंबई ब्युरो मध्ये गेल्या वर्षभरापासून मुंबई प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी  ई टीव्ही भारत,लोकमत आणि मुंबई तरुण भारत या माध्यम समूहांमध्ये कार्यरत होते. सर्वसामान्य घडामोडींसह राजकीय बातम्याचं वार्तांकन ते करतात.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
मोठी बातमी : अंधेरी MIDC परिसरात ताडीच्या अतिसेवनाने आतापर्यंत तिसरा बळी, 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबीय आक्रमक
मोठी बातमी : अंधेरी MIDC परिसरात ताडीच्या अतिसेवनाने आतापर्यंत तिसरा बळी, 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबीय आक्रमक
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
Embed widget