एक्स्प्लोर

‘त्या’ प्रश्नावर उद्धव ठाकरे भडकले!

एका दिवसाच्या पावसात मुंबई पाण्याखाली गेली. याचविषयी सवाल उपस्थित केल्यानं उद्धव ठाकरेंना मात्र भलताच राग आला.

  मुंबई : 25 वर्षापासून मुंबई पालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. तरीही प्रत्येक पावसात मुंबई पाण्याखाली जाते. मुंबईकरांची दैना होते. लोकांचा जीव जातो आणि काही लोक बेपत्ताही होतात. अर्थात हे सगळं होऊ नये म्हणून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होतो. नालेसफाई, रस्तेदुरुस्ती केली जाते. तरीही यावर्षी काल एका दिवसाच्या पावसात मुंबई पाण्याखाली गेली. याचविषयी सवाल उपस्थित केल्यानं उद्धव ठाकरेंना मात्र भलताच राग आला. ‘मुंबईत नीट कामं झाली आहेत. आता तुम्ही फक्त पावसाला येऊ नको असं सांगा’, असं अजब उत्तर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला दिलं. उद्धव ठाकरेंचा पारा का चढला? प्रश्न : पाऊस जास्त पडल्यानं मुंबई पाण्याखाली गेली? हेच उत्तर किती वेळा ऐकायला मिळणार आहे? उद्धव ठाकरेंचं उत्तर : तुम्ही पाऊस थांबवा, तुम्ही पाऊस थांबवा... हेच उत्तर आहे. मग तुमचा उपाय सांगा, पाऊस कसा थांबवायचा?, आम्ही काय केलं ते मी सांगतो. तुम्ही असं समजू नका की, मुंबईचा ठेका तुम्ही घेतलेला आहे. हे कृपा करुन समजू नका. आम्ही सुद्धा जनतेला बांधिल आहोत. तुम्ही म्हणजे जनता असं समजू नका. जनतेची सेवा करतो म्हणूनच जनतेनं वारंवार आम्हाला आशीर्वाद दिले आहेत. जनतेची सेवा कशी करायची आहे ती आम्ही करतो आहोत. असं अजिबात समजू नका की, आमचा आणि जनतेचा अजिबात संपर्क नाही. तुमच्याही पेक्षा जास्त आमच्या शिवसैनिकाचा संपर्क जास्त आहे. तो काल जेवढा घराघरात गेला तेवढे तुम्ही गेले नव्हतात. दरम्यान, नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाला असला तरी त्याला तोंड देण्यासाठी पालिकाही सज्ज नाही, हे वास्तव उद्धव ठाकरेंना पचलेलं दिसत नाही. काल (मंगळवार) मुसळधार पावसानं मुंबईला अक्षरश: झोडपून काढलं. त्यामुळे जवळजवळ संपूर्ण मुंबई ठप्प झाली होती. याचबाबत आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी पत्रकार परिषद घेतली. VIDEO : संबंधित बातम्या : काल मुंबईवर 9 किलोमीटर उंचीचा ढग होता : उद्धव ठाकरे मुंबईत पावसाची उघडझाप सुरुच, लोकल वाहतूक हळूहळू पूर्वपदावर LIVE : मुंबईचा पाऊस; रस्ते, रेल्वे ट्रॅफिक अपडेट्स महापौर म्हणतात, मुंबईच्या अवस्थेला एकटी महापालिका जबाबदार नाही! 26 जुलै 2005 आणि 29 ऑगस्ट 2017- काय फरक, काय साम्य? 26 जुलै 2005 आणि 29 ऑगस्ट 2017- काय फरक, काय साम्य? मुंबई-ठाण्यातील मुसळधार पावसामध्ये सहा जणांचा मृत्यू मुंबईच्या पावसाचे 3 बळी, विक्रोळीत 2 घरं कोसळून तिघांचा मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Monsoon Diseases : मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; पालिकेकडून खबरदारीचे आवाहन
मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; पालिकेकडून खबरदारीचे आवाहन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Uddhav Thackeray : 'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget