एक्स्प्लोर

आयुष्यभर ब्रम्हचारी राहण्याची शपथ घेतली असताना आजोबा या वयात का चढले बोहल्यावर

आयुष्यभर ब्रम्हचारी राहणार असल्याची शपथ घेणारे ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील हे 66व्या वर्षी बोहल्यावर चढले आहेत. मात्र, त्यांनी अचानक असा निर्णय का घेतला? हे आम्ही जाणून घेतला.

नवी मुंबई : तरुणपणी साखरपुडा मोडला म्हणून आयुष्यभर लग्न न करता ब्रम्हचारी राहिलेल्या माधव पाटील यांनी अखेर 66व्या वर्षी लग्न केलं. आयुष्यभर लग्न कर म्हणून मागे लागलेल्या नातलगांचे न ऐकता आपल्या निर्णयावर ठाम राहिलेल्या माधव पाटील यांचे कोरोनाने डोळे उघडले. फक्त स्वतःचाच विचार न करता अर्धांगिनीच्या कुटुंबालाही माधव पाटील यांनी न्याय दिला आहे.

गेल्या महिनाभरापासून ज्या आजोबांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांची टिंगल टवाळीही केली जात आहे. शेरोशायरी करून लग्न केलेल्या आजोबांची टर उडवली जात आहे. त्या आजोबांच्या वयाच्या असलेल्या माधव पाटील यांना भेटण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केला. उरण तालुक्यातील बामणडोंगरी गावात राहणारे माधव पाटील गेल्या 35 वर्षांपासून पत्रकारिता करतात. रायगड मधील ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र, म्हातारपणी लग्न केल्यामुळे ते आणखीचं प्रसिद्ध होत आहेत.

..अन् आयुष्यभर अविवाहित राहण्याची निर्णय आयुष्यभर लग्नच न करणाऱ्या माधव पाटलांनी वयाच्या 66व्या वर्षी का लग्न केले असेल, याबाबत आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. माधव पाटील यांचे वयाच्या तिशीत लग्न ठरले होते. साखरपुढाही वाजत गाजत झाला होता. मात्र, कुठेतरी माशी शिंकली आणि झालेला साखरपुढा मोडला. यानंतर मात्र लग्न या व्यवस्थेवरील विश्वास उडालेल्या माधव पाटील यांनी लग्नच न करण्याचा निर्णय घेतला. वय वाढत होतं, घरात एकूलता एक मुलगा होता. घरात सूनबाई येईल, कामाला हातभार लागेल, खानदानाला वारस मिळेल, अशा सर्व प्रकारे माधव पाटलांना सांगूनही ते लग्नासाठी राजी झाले नाहीत. अखेर कोरोनाने माधव पाटलांचे डोळे उघडले.

..म्हणून माधव पाटील या वयात बोहल्यावर

घरात गेली 7 महिने काढणाऱ्या माधव पाटलांना एकांत खाऊ लागला. सहचारीनी असावी अशी भावना त्यांना जाणवू लागली. आईचे वय 88 वर्ष, स्वतःचे वय 66 वर्ष. त्यामुळे घरात सांभाळणारे कोणीतरी असावे. याची जाणीव झाली. यामुळे अखेर माधव पाटील यांनी 66व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी संजना यांच्याशी पहिलेच लग्न झाले असले तरी संजना यांचे दुसरे लग्न आहे. घटस्पोटीत असलेल्या संजना यांचे वय 45 असून त्यांच्या माहेरी भावाचे कोरोनाने निधन झाल्याने आधार हारपला होता. त्यांनाही उतार वयात आधाराची गरज असल्याने आपल्या पेक्षा 20 वर्ष वयाने मोठ्या असलेल्या माधव पाटील यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आजोबांच्या वयातील व्यक्तीशी लग्न का करतेस याबाबत त्यांना नातेवाईक, मित्रमंडळी यांनी हिनवले. पण त्यांनी याची परवा न करता उतार वयात साथ देण्यासाठी लग्नगाठ बांधली.

सोशल मीडियावर सध्या टिकेचे, टिंगल-टवाळीचे, मजाक-मस्तीचे कारण झालेल्या माधव पाटील आणि संजना पाटील यांना त्याची परवा नाही. समाजासाठी 35-40 वर्ष खर्च करून पत्रकारीता, समाजकारण, राजकारण करून शेवटी पदरात टिकाच पडत असेल तर ती झेलायला समर्थ असल्याचे माधव पाटील सांगतात.

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget