एक्स्प्लोर

सनातन संस्थेला वाचवणारे सरकारमधील साधक कोण? : खा. अशोक चव्हाण

नरेंद्र दाभोलकर, एम. एन. कलबुर्गी व डॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याकांडाशीही सनातन संस्थेचा संबंध आहे. हे ही यातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सनातन संस्थेवर बंदी घालावी या मागणीचा चव्हाण यांनी पुनरूच्चार केला.

मुंबई : कर्नाटक सरकारच्या विशेष तपास पथकाने गौरी लंकेश हत्या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात सनातन संस्थेचे नाव आरोपी म्हणून घेतले आहे. यातूनच सनातन संस्था ही अत्यंत घातक संस्था असून हिंसक कारवायांमध्ये गुंतलेली आहे, या वस्तुस्थितीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. या अगोदरही या संदर्भातील अनेक पुरावे समोर आले असतानाही सनातन संस्थेवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे सनातन संस्थेला वाचवणारे सरकारमधील साधक कोण? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे. या संदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी सनातन संस्थेशी संबंधित आहेत आणि सनातन संस्थेने इतर कट्टरवादी संघटनांच्या मदतीने ही हत्या घडवून आणली असा स्पष्ट उल्लेख कर्नाटक पोलिसांच्या विशेष पथकाने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात आहे. तसेच नरेंद्र दाभोलकर, एम. एन. कलबुर्गी व डॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याकांडाशीही सनातन संस्थेचा संबंध आहे. हे ही यातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सनातन संस्थेवर बंदी घालावी या मागणीचा चव्हाण यांनी पुनरूच्चार केला. या अगोदरही मुंबईजवळ नालासोपारा येथे सनातनच्या साधकाकडे जिवंत बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्यासाठी लागणा-या साहित्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी सनातनच्या काही साधकांना अटकही करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याने आरोपींचा मोठ्या प्रमाणात घातपात करण्याचा कट होता. हे स्पष्ट झाले असतानाही सरकारने सनातनवर कोणतीही कारवाई केली नाही. 2008 साली गोव्यात झालेल्या बॉम्बस्फोटात सनातनच्या साधकांचा हात होता. हे एका वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन करून समोर आणले. तरीही या प्रकरणी सनातन संस्थेची साधी चौकशी करण्याची तसदीही सरकारने घेतली नाही. कर्नाटक सरकारने या प्रकरणात चौकशी केली नसती तर सत्य समोर आले नसते. या प्रकरणातील महाराष्ट्र सरकारची भूमिका पूर्णपणे संशयास्पद आहे असे चव्हाण म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
Hardik Pandya : हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
Chandrashekhar Bawankule : सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकलेत; भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे खळबळजनक वक्तव्य
सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकलेत; भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे खळबळजनक वक्तव्य
BMC : ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबई जिंकण्याचा निर्धार, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याची तारीख ठरली, मनसेसोबत युतीबाबतही घोषणा होण्याची शक्यता
ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबई जिंकण्याचा निर्धार, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याची तारीख ठरली, मनसेसोबत युतीबाबतही घोषणा होण्याची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Riteish Deshmukh : रितेशनं मोडली पाडव्याची परंपरा, पत्नीचं केलं औक्षण
Dahisar Fire: शिंदे शिवसेनेच्या River Festival जवळ भीषण आग, नागरिकांची उडाली प्रचंड धावपळ
Mumbai Crime: 'फटाके का फोडता?', विचारताच भाजप कार्यकर्त्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला, चौघांना अटक
Underworld Crackdown: दाऊदचं ड्रग रॅकेट उद्ध्वस्त, दुबईतून सूत्रधाराला अटक
Chhath Puja Politics: मुंबईत छठ पूजेची तयारी, मंत्री Lodha आणि अध्यक्ष Satam घेणार 'BMC'चा आढावा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
Hardik Pandya : हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
Chandrashekhar Bawankule : सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकलेत; भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे खळबळजनक वक्तव्य
सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकलेत; भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे खळबळजनक वक्तव्य
BMC : ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबई जिंकण्याचा निर्धार, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याची तारीख ठरली, मनसेसोबत युतीबाबतही घोषणा होण्याची शक्यता
ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबई जिंकण्याचा निर्धार, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याची तारीख ठरली, मनसेसोबत युतीबाबतही घोषणा होण्याची शक्यता
पुण्यात बस चालकाची मुजोरी, चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली, घटना कॅमेऱ्यात कैद
पुण्यात बस चालकाची मुजोरी, चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली, घटना कॅमेऱ्यात कैद
काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं
काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं
Rani Kittur Chennamma : वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
Embed widget