Sheetal Mhatre : पत्रकार ते शिवसेना शिंदे गटाचा खणखणीत आवाज... व्हायरल व्हिडीओप्रकरणी चर्चेत आलेल्या शितल म्हात्रे कोण?
Sheetal Mhatre Viral Video : सध्या शितल म्हात्रे या मॉर्फ व्हायरल व्हिडीओ प्रकरणी चर्चेत आहेत. व्हायरल व्हिडीओ प्रकरणातील शीतल म्हात्रे कोण आहेत जाणून घ्या.
Who is Sheetal Mhatre : सध्या शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे या मॉर्फ व्हायरल व्हिडीओ प्रकरणी चर्चेत आहे. शितल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचा एक व्हिडीओ मॉर्फिंग करुन अश्लील संदेश लिहून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रॅली दरम्यानचा एक व्हिडीओ आक्षेपार्ह प्रकारे एडिट करुन प्रचंड व्हायरल केल्याचा आरोप करण्यात येतोय. याप्रकरणी आता दोन जणांना अटक करण्यात आलेली आहे. दरम्यान, व्हायरल व्हिडीओ प्रकरणातील शीतल म्हात्रे कोण आहेत जाणून घ्या.
Who is Sheetal Mhatre : कोण आहेत शीतल म्हात्रे?
शीतल म्हात्रे या शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि प्रवक्त्या आहेत. बंडाआधी त्या मूळ शिवसेनात होत्या. शिवसेना आमदारांच्या बंडानंतर त्या शिंदे गटात सामील झाल्या. शीतल म्हात्रे माजी नगरसेविका आहेत. उत्तर मुंबईच्या दहिसर वॉर्ड नंबर 8 मधून त्यांनी दोन वेळा नगरसेविक म्हणून निवड झाली होती. राजकारणात येण्याआधी त्या पत्रकार म्हणून सक्रिय होत्या. शीतल म्हात्रे यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली होती. त्या 10 ते 15 वर्ष राजकारणात सक्रिय आहेत. शीतल म्हात्रे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात.
शीतल म्हात्रे यांचा राजकीय प्रवास
शीतल म्हात्रे या शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या आहेत. त्या अलिबाग आणि पेण येथील शिवसेनेच्या माजी संपर्कप्रमुख आहेत. त्यांनी दोन वेळा प्रभाग समिती अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली आहे.
शिवसेना बंडावेळी आल्या होत्या चर्चेत
शीतल म्हात्रे या राजकीय उलथापालथीवेळी चर्चेत आल्या होत्या. आधी शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदारांना खडसावणाऱ्या शीतल म्हात्रे स्वत:च शिंदे गटात झाल्याने याची त्यावेळी जोरदार चर्चा रंगली होती. त्यावेळी शीतल म्हात्रे यांचा बंडखोर आमदारांना खडसवतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसात त्यांनी भूमिका बदलली आणि शिंदे गटात प्रवेश केला होता.
व्हिडीओ मॉर्फ असल्याचा शीतल म्हात्रे यांचा आरोप
सोशल मीडियावर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मॉर्फ असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. आपली बदनामी करण्यासाठी हा खोटा व्हिडीओ तयार करण्यात आला असून ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा यामागे हात असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केलाय. रविवारी पहाटे शीतल म्हात्रे यांनी याबाबत दहिसर पोलिसात तक्रार केली होती.
दरम्यान, हा व्हिडीओ फॉरवर्ड करून व्हायरल करणाऱ्या दोघांना दहिसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोलीस त्यांना अटक करणार असल्याची माहिती आहे. हा व्हिडीओ कोणी बनवला आणि कोणी व्हायरल केला याचा दहिसर पोलीस तपास करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Sheetal Mhatre: शितल म्हात्रे व्हिडीओ प्रकरण, व्हिडीओ फॉरवर्ड करुन व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक