Arun Gawli Daughter Marriage: राज ठाकरे डॅडी उर्फ अरूण गवळीला भेटतात तेव्हा...व्हिडिओ व्हायरल
Arun Gawli Daughter Marriage: अरुण गवळीला 2012 साली शिवसेना नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

मुंबई : कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या मुलीचे लग्न मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडले. या लग्न सोहळ्याला राजकीय जगतातील बड्या नेत्यांनी सहभाग घेतला होता. अरुण गवळी यांची धाकटी मुलगी अस्मिता गवळी हिचे लग्न झाले. करण असे जावयाचे नाव असून तो भाजीचा व्यवसाय करतो. मुंबईतील रेडिओ क्लबमध्ये लग्न आणि सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या लग्नाला महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरही या लग्नाला उपस्थित होते. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. राज ठाकरे देखील या लग्नाला उपस्थित राहिले होते, या लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. अरुण गवळी याच्या मुलीचे लग्न पार पडले, अनेक दिग्गज नेत्यांनी त्याच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावली, या सोहळ्याचे फोटो देखील समोर आले आहेत.
अरुण गवळी अन् राज ठाकरे यांचा व्हिडिओ व्हायरल
या लग्न सोहळ्यामध्ये राज ठाकरेंची एंन्ट्री आणि त्यांनी आणि अरुण गवळी यांनी समोरासमोर आल्यानंतर केलेलं हस्तांदोलन याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये राज ठाकरे आणि अरुण गवळी समोरासमोर येतात आणि हातात हात देतात. त्यानंतर एकमेकांकडे पाहून हसतात. सध्या अरूण गवळीच्या मुलीच्या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. अनेक दिग्गज नेते या सोहळ्याला उपस्थित होते.
दरम्यान, शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2007 मध्ये अटक केल्यानंतर मुंबईतील सत्र न्यायालयाने 2012 मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. गवळी यानी ऑल इंडिया आर्मी नावाची संघटना स्थापन केली. राज ठाकरे यांनी उपस्थितांना हात जोडून अभिवादन केले. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हेही या कार्यक्रमाचा एक भाग झाले.
View this post on Instagram
कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरण नेमकं काय?
मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांचं त्यांच्या भागातील सदाशिव सुर्वे नावाच्या इसमासोबत प्रॉपर्टीवरुन वाद सुरु होता. त्यानंतर सदाशिवने गवळीच्या हस्तकांमार्फत त्यांची सुपारी दिली. प्रताप गोडसेला गवळीने या सुपारीची जबाबदारी दिली होती. याप्रकरणी आपलं नाव येऊ नये यासाठी नवे शूटर्स शोधण्यास सांगण्यात आलं होतं.
गोडसेनंनंतर श्रीकृष्ण गुरवमार्फत नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची यासाठी निवड केली. या दोघांना अडीच-अडीच लाख रुपये देण्याचं कबुल केलं आणि अॅडव्हान्स म्हणून 20-20 हजार रुपये दिले. विजयकुमार गिरीने अशोककुमार जयस्वालसोबत जवळपास 15 दिवस जामसंडेकरवर पाळत ठेवली. अखेरीस 2 मार्च 2007 रोजी संधी मिळताच जामसंडेकरच्या राहत्या घरी त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
