एक्स्प्लोर

मनसेने चोप दिलेला 'तो' इस्टेट एजंट बेपत्ता

स्वस्तात विरारमध्ये घर घेऊन देतो अशी बतावणी करून एका कॅन्सरग्रस्त रुग्णाचे पैसे न देणऱ्या एका इस्टेट एजन्टला मनसे नेत्यांनी काल मारहाण केली. परंतु त्यानंतर हा एजंट बेपत्ता झाला आहे.

विरार : स्वस्तात विरारमध्ये घर घेऊन देतो अशी बतावणी करून एका कॅन्सरग्रस्त रुग्णाचे पैसे न देणऱ्या एका इस्टेट एजन्टला मनसे नेत्यांनी काल मारहाण केली. मारहाण करताना त्याचे फेसबुक लाईव्हदेखील केले. या घटनेनंतर त्या इस्टेट एजन्टशी संपर्क झालेला नाही. तसेच याप्रकरणी अद्याप कोणीही तक्रार दाखल केलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. काल रात्रीपासून मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका इस्टेट एजंटला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विरार पूर्वेच्या एका इस्टेट एजन्टने एका कॅंन्सर पेशंटचे पैसे घेऊन, त्याची फसवणूक केली होती. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या स्टाईलने त्याला चोप दिला. विरार पूर्व येथे चांगल्या किंमतीत जागा घेऊन देण्याचे आमिष दाखवून राजू शेट्टी या इस्टेट एजन्टने 65 वर्षीय कॅन्सर पीडित बळवंत सुर्यवंशी यांच्याकडून 2013 साली 17 लाख रुपये घेतले होते. सुर्यवंशी हे 2008 पासून कर्करोगाने ग्रासले आहेत. तेव्हापासून त्यांच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू आहेत. 17 लाख घेऊनही शेट्टी हा सुर्यवंशी यांना घर देत नव्हता. त्यामुळे सुर्यवंशीनी मनसेच्या वाहतुक सेनेचे अध्यक्ष नितीन नांदगावकर यांच्या जनता दरबारात याची तक्रार केली. सुर्यवंशी यांनी तक्रार केल्यानंतर नांदगांवकर यांनी ही तक्रार फेसबुकवर शेअर केली. सोशल मीडियावर नांदगांवकरांची कैफियत समोर आल्यावर राजू शेट्टी याने विरार येथील गोकुल टाउनशीप येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख गणेश बंगेरा यांच्याशी संपर्क साधला, गणेशने आपले मित्र शाखाप्रमुख विवेक पवार यांच्याशी संपर्क साधून, मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याशी संपर्क साधला व समन्वयासाठी आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. मंगळवारी सायंकाळी राजू शेट्टी गणेश बंगेराच्या कार्यालयात असताना मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव तेथे आले. राजू शेट्टी याने त्यांना सुर्यवंशी यांच्या 16 लाख 50 हजार रुपयांचा चेक दिला. परंतु मनसेने बंगेरांच्या कार्यालयातच राजू शेट्टीला चोप दिला आणि त्याचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर शेअर केला. राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते उपलब्ध होवू शकले नाहीत. त्यांचा फोनही लागत नाही. अविनाश जाधवांनी ज्या बियर शॉपीचा उल्लेख केला आहे. ती बियर शॉपी तो भाड्याने चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. तर तेथील मॅनेजरने एबीपी माझाशी बोलताना शेट्टीने सुर्यवंशीचे पैसे घेतल्याचे कबूल केले आहे. तसेच शेट्टी सुर्यवंशी यांचे पैसे देणार होता असेही सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Embed widget