एक्स्प्लोर
वर्सोवा-लोखंडवाला लिंक रोडच्या कामात कांदळवनांचा बळी?हायकोर्टाची स्थगिती कायम
मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी आणि त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वर्सोवा ते लोखंडवाला लिंक रोड एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात येणार आहे. परंतु या कामासाठी तिथल्या कांदळवनाचा बळी जाणार असल्याचा आरोप करत वर्सोवातील काही रहिवाशांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी आणि त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वर्सोवा ते लोखंडवाला लिंक रोड एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात येणार आहे. परंतु या कामासाठी तिथल्या कांदळवनाचा बळी जाणार असल्याचा आरोप करत वर्सोवातील काही रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची दखल घेत हायकोर्टाने एमएमआरडीएसह, पालिका प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य सरकारला यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तूर्तास या कामाला दिलेली स्थगिती हायकोर्टाने चार आठवड्यांसाठी कायम ठेवली आहे. वर्सोवा ते लोखंडवाला या प्रस्थावित मार्गाच्या बांधकामप्रकरणी वर्सोवा येथील 'जय भारत' सोसायटीलाही नोटीस बजावली आहे. या बांधकामामुळे येथील कांदळवन बाधित होणार असून कामामुळे वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होणार आहे. त्यामुळे या सोसायटीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या कामात पर्यावरण संवंर्धनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सोमावारी सुनावणी झाली. यावेळी हायकोर्टाने दिलेली स्थगिती चार आठवड्यांसाठी कायम ठेवण्यात आली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























