एक्स्प्लोर

Vasant More VIDEO : तुम्ही तुमच्या राज्यात टॅक्स भरा, इकडे कशाला येता? X वर पोस्ट करुन YZ करणे बंद कर, नाहीतर... हातात बांबू घेऊन वसंत मोरेंचा निशिकांत दुबेला दम

Vasant More On Nishikant Dubey : चार पाच दिवस दुकाने बंद करा, मराठी माणूस उपाशी मरेल असं म्हणणाऱ्या परप्रांतियांनी महिनाभर त्यांची दुकानं बंद करावीत, मग कळेल कोण उपाशी मरतंय ते असं वसंत मोरे म्हणाले.

पुणे : मराठी माणसे आमच्या पैशावर जगतात असं म्हणणाऱ्या भाजपच्या खासदाराला ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी चांगलाच दम दिला. एक्सवर पोस्ट करून वाय झेड करणं बंद करा, नाहीतर आमच्या हातात असलेला बांबू कुठे आणि कधी वापरायचा हे माहिती आहे असं वसंत मोरे म्हणाले. एवढाच माज असेल तर तुमच्या राज्यात जाऊन टॅक्स भरा, तिकडे जाऊन उद्योगधंदे करा. आमच्या मराठी माणसाचे उद्योग तुम्ही का घेता? असा प्रश्नही वसंत मोरे यांनी विचारला. 

बाहेरच्या राज्यात राहून, एसीत बसून हे असे वादग्रस्त वक्तव्य करतात आणि भोगावं लागतंय ते इथल्या लोकांना, असं वसंत मोरे म्हणाले. एक्स वर पोस्ट करुन वायझेड करणं बंद करा, आणि ते जर येणार असतील मारामारीला, तर आमच्याकडे बांबू आहेत. हे बांबू आम्हाला कुठे आणि कधी वापरायचे माहिती आहेत असा दमही त्यांनी दिला. 

असं वक्तव्य म्हणजे लज्जास्पद बाब आहे 

आम्ही किती टॅक्स देतो हे निशिकांत दुबेने शिवसेना मनसेला न विचारता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं पाहिजे. ते म्हणतात की महाराष्ट्र नंबर वन आहे. मग तो नंबर वन हा बाहेरच्या लोकांमुळे आहे का? असं वसंत मोरे म्हणाले.

बोलायच्या आधी केडियाला कॉल करा

वसंत मोरे म्हणाले की, "बाहेरुन आलेल्या व्यावसायिकांनी इथे येऊन राजकारण करु नये. एकतर त्यांनी व्यापार करावा किंवा राजकारण करावं. त्यांना राजकारण करायचं असेल तर त्यांनी आधी केडियाला फोन करून विचारावं. निशिकांत दुबे हा भाजपचा खासदार असून त्यांची पिळावळ वाढली आहे. यांना प्रांतवाद करायचा आहे आणि राजकारण करायचं आहे."

तुम्ही महिनाभर दुकाने बंद करा

मीरा भाईंदरमध्ये एक महिला म्हणते की चार-पाच दिवस दुकाने बंद करा. मराठी माणसे उपाशी मरतील. मला या बाहेरच्या सगळ्या लोकांना विनंती करायची आहे. चार पाच दिवस नव्हे तर महिनाभर दुकाने बंद करा. मग पाहुयात कोण उपाशी मरतंय ते? असं आव्हान वसंत मोरे यांनी दिलं. मराठी माणसाला विनंती आहे की ज्यांना ज्यांना भाड्याने दुकाने दिली आहे त्यांना जाब विचारा असंही ते म्हणाले. 

यांना ठाकरे ब्रँड काय आहे हे त्यांना माहिती आहे. आतापर्यंत फक्त ट्रिझर दाखवला. जर पिक्चर पाहायचा असेल तर त्यांनी यावं महाराष्ट्रात असं आव्हान वसंत मोरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना दिलं. निशिकांत दुबेने त्याच्या मुंबईतील त्याच्या नातेवाईकांना आधी विचारावं आणि मग अशी वक्तव्य करावी असं वसंत मोरे म्हणाले. 

काय म्हणाले होते निशिकांत दुबे? 

महाराष्ट्राबाहेर या, पटकून मारू अशा शब्दात भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेणाऱ्या ठाकरे बंधूंना आव्हान दिलं. तसंच हिंमत असेल तर महाराष्ट्रातील मुस्लिम, तामिळ, तेलगू यांना मारून दाखवा अशा शब्दात दुबे यांनी  उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना डिवचलं. तुम्ही कुणाच्या जीवावर जगताय, तुमच्याकडे काय आहे असा सवाल दुबेंनी विचारला. दुबेंच्या या चिथावणीखोर भूमिकेमुळे मोठा राजकीय वाद उफाळणार हे सांगण्याची गरज नाही.

मराठी माणसे आमच्या जीवावर जगतात 

मराठी लोक कुणाची भाकर खातात, आमच्याच पैशांवर तुम्ही मराठी लोक जगताय अशी मुक्ताफळे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी उधळली. मराठी लोकांकडं कोणते उद्योग आहेत, खाणी आमच्याकडे आहेत, तुमच्याकडे आहेत का? असा प्रश्न त्यांनी विचारला. मराठी आंदोलक सलाऊद्दीन, मसूद अजहर, दाऊदसारखे असल्याची टीका निशिकांत दुबे यांनी केली. 

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांचाकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांचाकडून गैरफायदा
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Embed widget