एक्स्प्लोर

कोरोना प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन विद्यापीठ, महाविद्यालय अन् सीईटी परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर होणार

कोरोना संकटामुळे विद्यापीठ, महाविद्यालय आणि अनेक सीईटी परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, आता कोरोना प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन या परिक्षांचे वेळापत्रक नव्याने जाहीर होणार आहे.

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये परीक्षे संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. आज सकाळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटीसेलकडून पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा रद्द होणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, या सर्व परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर केले जाणार असल्याचे या बैठकीत ठरले आहे. या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, एसएनडीटी विद्यापीठाचे कुलगुरु शशिकला वंजारी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून महाविद्यालयीन परीक्षेचे वेळापत्रक नियोजन, शैक्षणिक वर्षाचे नियोजन असा अहवाल तयार करून विभागाचे सचिव आणि मंत्री यांना सादर करतील त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल.

Coronavirus | कोरोनाच्या संकटातही भाजपची प्रचार मोहीम, मास्कवर शेलार यांचं नाव

विद्यापीठात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मल्टीपर्पज लॅब राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आकृषी विद्यापीठांमध्ये विविध प्रकारच्या आजारा संदर्भातील चाचण्या घेता येतील अशा स्वरूपाच्या मल्टिपर्पज लॅब विद्यापीठांमध्ये सुरू करण्याच्या सूचनाही उदय सामंत यांनी आज दिल्या आहेत. स्वामी रामानंद तीर्थ नांदेड विद्यापीठाने अशा प्रकारची लॅब सुरू केली आहे. यासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सर्व परवानगी तातडीने देण्यात येथील त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील इतर विद्यापीठांनी आपल्याकडे अशा प्रकारच्या लॅब सुरू कराव्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्य शासनाकडून सर्व परवानग्या देण्यात येतील अशी ग्वाही उदय सामंत यांनी दिली आहे.

मुंबईतील 'कोरोना'चे हॉटस्पॉट, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान 'मातोश्री'ही गंभीर स्थितीतील विभागात

आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी एनएसएसच्या विद्यार्थ्यांचीही मदत आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी एनएसएसच्या विद्यार्थ्यांचीही मदत घेता येईल का याचा सर्व विद्यापीठाने विचार करावा. काही दिवसांपूर्वी सोलापूर विद्यापीठाने यासाठीचा एक प्रयोग सुरू केला आहे. एनएसएसच्या 27 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या आईवडिलांकडून परवानगी घेऊन हे विद्यार्थी आरोग्यसेवेच्या यंत्रणेसाठी सहकार्य करत आहेत. त्याच धर्तीवर राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये सुद्धा विद्यार्थी आरोग्य यंत्रणेच्या सेवेसाठी देता येतील यासाठीचा अहवाल तयार करावा अशा सूचनाही सामंत यांनी कुलगुरूंना केल्या.

Lockdown | संचारबंदीचं उल्लंघन केल्याने भाजप आमदार दादाराव केचे यांच्यावर गुन्हा दाखल

महत्त्वाच्या बातम्या

Orchestra Bar Bill : ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा! कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर
ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा! कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित मातोश्रीवर आमदारांची  बैठक सुरु, बैठकीला कोणकोणते आमदार उपस्थित?
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित मातोश्रीवर आमदारांची  बैठक सुरु, बैठकीला कोणकोणते आमदार उपस्थित?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश

Embed widget