एक्स्प्लोर
केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या आईचं निधन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आई हौसाबाई आठवले यांचं मुंबईत अल्पशा आजारानं निधन झालं.

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आई हौसाबाई आठवले यांचं मुंबईत अल्पशा आजारानं निधन झालं. त्या 88 वर्षाच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी सातच्या सुमारास त्यांनी वांद्रे येथील गुरूनानक रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. दुपारी तीन वाजता त्यांच्यावर खेरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. पतीचं निधन झाल्यानंतर त्यांनी मोठ्या कष्टानं रामदास आठवले यांना सांभाळलं होतं. दुसऱ्यांच्या शेतीवर मजुरी करून त्यांनी रामदास आठवले यांचं शिक्षण पूर्ण केलं. रामदास आठवले यांनी जेव्हा पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हाही त्या शेतात मजुरी करत होत्या.
आणखी वाचा























