एक्स्प्लोर

आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा राज्याच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे, हा वाद मिटला पाहिजे : रामदास आठवले

मनसे-भाजप युतीबाबत बोलताना, मनसे आणि भाजपची भूमिका वेगळी आहे. मी भाजपला सांगणार आहे की मनसेसोबत युती करू नका. मनसे सोबत गेल्यास भाजपचे मोठे नुकसान होईल, असं रामदा़स आठवले यांनी म्हटलं.

कल्याण : कल्याणमध्ये आज आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते  देवचंद आंबदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री रामदास आठवले येथे आले होते. या कार्यक्रमात भाजप आमदार गणपत गायकवाड, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात स्वागत करताना दोघांनी एकमेकांचे नाव घेतले नाही. मात्र याबाबत रामदास आठवले यांनी चिमटा काढत राजकारणात कुणीही कुठंही येऊ शकतं, असं सूचक वक्तव्य केलं. या  कार्यक्रमात पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, कल्पना सरोज आदी मान्यवर उपस्थित होते. 

नारायण राणे विरुद्ध शिवसेना वादावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

आता राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे सत्ता असली तरी मागील 35 वर्ष शिवसेना भाजप युती होती, अजूनही वेळ गेली नाही. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या भल्याचा विचार केल्यास पुन्हा शिवसेना, भाजप, आयपीआय महायुतीची सत्ता येऊ शकते. राणे आणि शिवसेना वादाबाबत बोलताना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी  राज्याच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे, हा वाद मिटला पाहिजे असा सल्ला आठवले त्यांनी दिला. तसेच राणे यांच्यावर जी अटकेची कारवाई झाली ती चुकीची असल्याचं त्यांनी सांगितलं.

मनसे-भाजप युती झाल्यास भाजपाला मोठे नुकसान होण्याची शक्यता

मनसे-भाजप युतीबाबत बोलताना, मनसे आणि भाजपची भूमिका वेगळी आहे. मी भाजपला सांगणार आहे की मनसेसोबत युती करू नका. मनसे सोबत गेल्यास भाजपचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे मनसे भाजप युती होणं अशक्य आहे ,आरपीआय भाजप सोबत असताना मनसेची गरज नाही, असं स्पष्ट केलं.

पुणे आणि आसपासच्या भागात राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत जास्त आहेत. स्थानिक पातळीवर अत्याचार होतात. शरद पवार आणि अजित पवार यांच्या सांगण्यावर हे अत्याचार होत नाहीत. मात्र स्थानिक पातळीवर अत्याचार होत असल्याची माहिती राज ठाकरे यांना मिळाली असावी म्हणून त्यांनी तसे विधान केले असावे, असं रामदास आठवले यांनी म्हटल. तसेच आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक आरपीआय भाजप सोबत लढणार असल्याचं आठवले यांनी सांगीतले. 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Mumbai Crime News: कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू

Embed widget