एक्स्प्लोर

पुण्याच्या गणेशोत्सवातून टिळकांना हटवणं म्हणजे निर्लज्जपणा : उद्धव ठाकरे

पुण्यात होणाऱ्या गणपती उत्सवातून लोकमान्य टिळकांचा चेहराच त्यांनी हटवला आहे. एवढा कोडगेपणा आणि निर्लज्जपणा आपल्यात आला आहे.

मुंबई : पुण्यातील गणेशोत्सवामधून लोकमान्य टिळकांना हटवणं म्हणजे कोडगेपणा आणि निर्लज्जपणा आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे. 'मार्मिक' या मासिकाच्या 57व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली, यावरुन पुण्यात भाऊ रंगारी आणि लोकमान्य टिळक समर्थकांमध्ये वाद सुरु आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या लोगोवर टिळक आणि रंगारी यापैकी कोणाचाही फोटो न लावण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या लोगोत टिळकांचा फोटो नाही त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले की, "पुण्यात होणाऱ्या गणपती उत्सवातून लोकमान्य टिळकांचा चेहराच त्यांनी हटवला आहे. एवढा कोडगेपणा आणि निर्लज्जपणा आपल्यात आला आहे. गणपती उत्सवाच्या माध्यमातून ज्यांनी एका सणाची चळवळ केली, त्या लोकमान्य टिळकांनीची आठवण आपण विसरायला लागलो तर पुढे काळोखाशिवाय काही राहणार नाही. कपाळ करंटे म्हणून आपली इतिहासात नोंद होईल." दरम्यान, 'वंदे मातरम'चा विरोध करणाऱ्या नेत्यांचाही उद्धव ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. "26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट जवळ आला की आपल्या सगळ्यांना देशप्रेमाचं भरतं येतं. मग आपल्याला राष्ट्रगीत आठवतं, वंदे मातरम आठवतं. महापालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम आठवड्यातून दोनदा की तीनदा करण्यापेक्षा रोज करा. रोज वंदे मातरम बोललंच पाहिजे," असं उद्धव ठाकरे म्हणाले. गणेशोत्सवाच्या तोंडावर टिळक आणि भाऊ रंगारी समर्थक भिडले काय आहे वाद? पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला 125 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने पुणे महापालिकेकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने अनेक कार्यक्रम पत्रिका छापण्यात आल्या आहेत, फ्लेक्स तयार केले आहेत. मात्र त्यावर लोकमान्य टिळकांच्या फोटोऐवजी गणपतीचा फोटो असेल, असा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या निर्णयाला वादाची पार्श्वभूमी आहे. मानाच्या पाच गणपतींपैकी एक असलेल्या भाऊ रंगारी गणपती मंडळाचा दावा आहे की, “लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात करण्याच्या दोन वर्ष आधी भाऊ रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्यामुळे यंदा शतकोत्तर रौप्य वर्ष नाही तर त्याआधीच गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. या संदर्भातील पुरावे आम्ही सातत्याने सादर केले आहेत. यावरुन वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे पत्रिका आणि फ्लेक्सवर लोकमान्य टिळक किंवा भाऊ रंगारी यांच्या फोटोऐवजी फक्त गणपतीचा फोटो लावायचा, असा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
Embed widget