एक्स्प्लोर

Uddhav Thackeray on J P Nadda : अनेक आव्हानं पायदळी तुडवत शिवसेनेने भगवा रोवलाय : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray on J P Nadda : शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण त्यांना कल्पना नाही की शिवसेनेने अशी अनेक आव्हानं पायदळी तुडवत भगवा रोवलेला आहे," असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याला जे पी नड्डा यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याचा आधार आहे.

Uddhav Thackeray on J P Nadda : "शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण त्यांना कल्पना नाही की शिवसेनेने अशी अनेक आव्हानं पायदळी तुडवत भगवा रोवलेला आहे," असं वक्तव्य शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. मुंबईतील 'मातोश्री' (Matoshree) या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी जळगावातील शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. "राजकारणात हार जीत होत असते पण आता संपवण्याची भाषा केली जात आहे," असंही उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याचा आधार आहे. "शिवसेना संपतेय आता केवळ भाजपच राहणार," असं जेपी नड्डा म्हणाले होते.

जे पी नड्डा काय म्हणाले होते?
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्रात शिवसेना संपतेय, आता केवळ भाजपच राहणार, असं नड्डा पाटणा इथे एका कार्यक्रमात म्हटलं होतं. भाजपशी लढण्याची क्षमता कोणत्याही पक्षात नाही, भाजप सोडून अन्य सगळे राजकीय पक्ष संपतील, असं नड्डा म्हणाले होते.

कोणत्याही राजकारण्याकडून कोणाला संपवण्याची भाषा झाली नव्हती : उद्धव ठाकरे
जे पी नड्डा यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की,"आजपर्यंत अनेक वेळा शिवसेना फोडण्याचे प्रयत्न झाले. आता शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हे मी पहिल्यांदाच बोललो होतो की हा प्रयत्न शिवसेना संपवण्याचा आहे आणि ते परवा भाजप अध्यक्षांनी बोलून दाखवलं. पण त्यांना कल्पना नाही की शिवसेनेने अशी आव्हानं पायदळी तुडवत भगवा रोवलेला आहे. त्यामुळे राजकारणात हार जीत होत असते. पण कोणी कोणाला संपवण्याची भाषा याआधी आपल्या देशात राजकारण्यांकडून झाली नव्हती." 

आपली लढाई दोन-तीन पातळीवर : उद्धव ठाकरे
आपली लढाई दोन तीन पातळीवर सुरु आहे. रस्त्यावरच्या लढाईत आपण कमी पडणार नाही. कायद्याची लढाई सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. आपले वकील किल्ला लढवत आहेत. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. तिसरी लढाई तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं इथे येण्यापेक्षा जागेवरच पाय रोवून उभे राहा. ही लढाई मात्र कागदाची आहे. आता आणलेली शपथपत्रे देऊन पुन्हा जाऊन आणखी आणायचे आहेत."

Uddhav Thackeray on JP Nadda : त्यांना माहिती नाही, अनेक आव्हानं पायदळी तुडवत आम्ही भगवा रोवलाय

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Mumbai Hotel Food Prices : मुंबईत खाणं महागणार! हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार; 'आहार' संघटनेचा निर्णय
मुंबईत खाणं महागणार! हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार; 'आहार' संघटनेचा निर्णय

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
Embed widget