एक्स्प्लोर

निवडणुकांसाठी नव्हे, देशासाठी युद्ध करा : उद्धव ठाकरे

मुंबई : पाकिस्तानशी आता केवळ चर्चेने काम होणार नाही, तर त्यांच्याच भाषेत जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे, युद्ध व्हायचं असल्यास देशासाठी व्हावं, निवडणुकांसाठी होऊ नये, असं स्पष्ट मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.  पाकिस्तानची भाषा आपल्याला कधी समजणार? असा सवालही उद्धव यांनी उपस्थित केला. मागच्या पानावरुन पुढे उरीतील हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट आहे. पाकिस्तानची भाषा आपल्याला कधी समजणार? पाकिस्तान भारताशी कसा वागतो हे लक्षात ठेवा, त्यांना सडेतोड उत्तर देण्याची गरज आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. नरेंद्र मोदींकडे बहुमत आहे, त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवावा, अशी मागणीही त्यांनी केली. मागच्या पानावरुन पुढे जाणार असू तर मग बदल झाला असं आपण कसं म्हणायचं, असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी मांडला. संतापतो, थंड होतो आणि पुन्हा पाकमध्ये जाऊन गरम चहा हल्ल्यांची मालिका पाहता, ज्याला जे अश्रू ढाळायचेत ते ढाळा, आम्ही मात्र पाकिस्तानात जाऊन चहा पिऊन येतो, असं सरकार असं सांगतंय, असंच वाटत असल्याच उद्धव ठाकरे म्हणाले. आपण संतापतो, थंड होतो आणि पुन्हा पाकमध्ये जाऊन गरम चहा पितो, पाकिस्तानचे कलाकार, खेळाडू सगळ्यांचं स्वागत करतो, असा टोलाही उद्धव यांनी हाणला. चहा पित राहतो, अश्रू पुसण्याच्या आधी पुढील हल्ल्याची वाट पाहतो, असं धोरण आहे का? असा सवालही त्यांनी विचारला. सरकारचे मित्रपक्ष आहोत, हे आम्ही मानतो पाकिस्तानविरोधात ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे, सत्तेवर येण्यापूर्वी मोदींनी जी आश्वासनं दिली ती त्यांनी पाळावीत, अशी आठवणही उद्धव यांनी मोदींना करुन दिली. जनतेने मोठ्या विश्वासाने मतं दिली आहेत, हे पंतप्रधान मोदींनी विसरता कामा नये, असं उद्धव म्हणाले. आम्ही सरकारचे मित्रपक्ष आहोत, हे आम्ही मानतो, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपलाही टोला हाणला. अशाप्रकारचा हल्ला पहिल्यांदाच झाला नाही, यापूर्वी पठाणकोटमध्येही झाला आहे. पाकला हिंदुस्थानातील प्रत्येकाची भावना कळत नाही, तोपर्यंत या संतापाच्या भावनेला काही अर्थ नाही, या शब्दात उद्धव यांनी संताप व्यक्त केला. युद्ध व्हायचं असल्यास देशासाठी व्हावं, निवडणुकांसाठी होऊ नये, असंही उद्धव म्हणाले. मराठा आरक्षणावर स्वतंत्र अधिवेशन बोलवा मराठा आरक्षणावर एक दिवसीय स्वतंत्र अधिवेशन बोलवावं, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाच्या प्रश्नी प्रत्येक नेत्याने मत मांडावं, असं आवाहनही त्यांनी केलं. अॅट्रॉसिटी आणि आरक्षणावर विधिमंडळात चर्चा करावी. शरद पवारांनी या विषयावर संसदेत मुद्दा मांडावा, आम्ही राज्याच्या विधिमंडळात मांडू, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Vinayak Raut : गोमूत्र प्यायला दिले, डोक्यावरचे केस कापले; विनायक राऊतांच्या सूनेचे गंभीर आरोप, जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल
गोमूत्र प्यायला दिले, डोक्यावरचे केस कापले; विनायक राऊतांच्या सूनेचे गंभीर आरोप, जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल
Mumbai Marathi : मराठीत बोला, प्रवाशाची टीसीकडे मागणी; RPF स्थानकात प्रवाशाला तासभर बंदिस्त ठेवलं, रेल्वे प्रशासनाची मराठी विरोधी भूमिका
मराठीत बोला, प्रवाशाची टीसीकडे मागणी; RPF स्थानकात प्रवाशाला तासभर बंदिस्त ठेवलं, रेल्वे प्रशासनाची मराठी विरोधी भूमिका
Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Monsoon Update : भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर
भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Embed widget