एक्स्प्लोर

मुंबईतील विक्रोळीत शिवसेना उपविभागप्रमुखांवर गोळीबार प्रकरणी दोघांना अटक

खांद्याला गोळी लागल्याने चंद्रशेखर जाधव यांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतं. हल्ल्यानंतर स्थानिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. विक्रोळी पोलिसांनी त्याच्याकडील शस्त्रही जप्त केलं आहे.

मुंबई : विक्रोळी येथे शिवसेना उपविभाग प्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा छडा लावण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. दोन लोकांना या संदर्भात अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास मुंबई क्राईम ब्राँच आणि खंडणी विरोधी पथक करत असून हा हल्ला परदेशात असलेल्या डॉन प्रसाद पुजारी ने करायला लावला असल्याचं तपासातून सिद्ध झालं आहे. 9 डिसेंबर रोजी विक्रोळी येथे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव हे सकाळी देवळात दर्शनाला गेले असताना त्यांच्यावर दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या या हल्ल्यात एक गोळी जाधव यांच्या खांद्याला लागली आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यावेळी मंदिरात उपस्थित असलेल्या लोकांना दोघांपैकी एका हल्लेखोराला एकडण्यात यश आलं आहे. अटकेत असलेला आरोपी सागर मिश्रा तपासात कोणतीच माहिती देत नव्हता. हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राच्या साहाय्याने क्राईम ब्रान्चला हे शस्त्र कानपूर ओरडीनेन्स फॅक्टरी मध्ये तयार केलं असल्याचं समजलं. पाहा व्हिडीओ : मुंबईतील विक्रोळीत शिवसेना उपविभागप्रमुखावर गोळीबार खंडणी विरोधी पथकाने याप्रकरणी दोघांना अटक केली असून मध्येप्रदेशमधून कृष्णधर सिंह तर ठाण्यातून आनंद फडतरे या दोघांना अटक करण्यात आली आहे. परदेशात असलेला डॉन प्रसाद पुजारीने आपली दहशत मुंबईत स्थापित करण्यासाठी मध्येप्रदेशमध्ये असलेला मित्र कृष्णधर सिंह आणि सागर मिश्रा या दोघांना चांद्रशेखर जाधव यांच्यावर हल्ला करण्यासाठी मुंबईत पाठविले होते. मुंबईतील प्रसाद पुजारीच्या एका साथीदाराने या दोघांच्या राहण्याची सोय केली आणि विना नंबर प्लेटची बाईक यांना पुरवली, बाईक घेऊन हे विक्रोळीत आले आणि चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार केला होता. नागपूरच्या महापौरांवर गोळीबार नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या गाडीवर मंगळवारी (17 डिसेंबर) रात्री अज्ञातांनी गोळीबार केला होता. सुदैवाने या घटनेत संदीप जोशी थोडक्यात बचावले. मंगळवारी संदीप जोशी यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. या निमित्ताने ते कुटुंबासह निवडक मित्रांसह आऊटर रिंग रोडवरील धाब्यावर जेवायला गेले होते. परत येत असताना जोशी यांच्या कारवर बाईकवरुन आलेल्या हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget