(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गर्लफ्रेंडला भेटायचंय, कोणत्या रंगाचं स्टिकर वापरु? मुंबई पोलिसांनी उत्तर दिलं...
मुंबईत संचारबंदीदरम्यान अत्यावश्यस सेवेतील वाहनांनाच रस्त्यावर वाहतुकीची परवानगी आहे. यासाठी मुंबई पोलिलांनी हिरवा, पिवळा आणि लाल रंगाचे स्टिकरची वाहनांवर सक्ती केली आहे.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रस्त्यांवरील वाहनांची वाहतूक कमी कमी करण्यासाठी पोलिसांनी कठोर निर्णय घेतले आहेत. खासगी वाहनांसाठी तीन कलर कोड निश्चित करण्यात आले असून या कोडचा स्टिकर असलेली वाहनेच रस्त्यावर धावू शकणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून संबंधित वाहनांना स्थानिक पोलीस स्टेशनमधून हा कलर कोड स्टिकर मिळणार आहे. मात्र कलर कोड स्टिकरमुळे अनेकांची अडचण झाली आहे. महत्त्वाचं कारण असल्याशिवाय बाहेर पडणे कठीण बनलं आहे. अशाच एकाने मुंबई पोलिसांना ट्विटरवर प्रश्न विचारल आहे. "मला माझ्या गर्लफ्रेन्डची आठवण येत आहे. तिला भेटायला बाहेर जाण्यासाठी कोणत्या रंगाच्या स्टिकरचा वापर केला पाहिजे.
@MumbaiPolice what sticker should I use in order to go out and meet my girlfriend? I miss her😔
— Ashwin Vinod (@AshwinVinod278) April 22, 2021
कडक शिस्तीच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई पोलिसांनी मात्र या यूजरला तितकच प्रेमाने उत्तर दिलं आहे. "गर्लफेंडला भेटण्याचं कारण तुमच्यासाठी आवश्यक असेल. मात्र हे कारण आमच्या अत्यावश्यक सेवेतील प्रकारात बसत नाही. अंतर नातं आणखी घट्ट करतं. सध्या आपण स्वस्थ आहात. तुम्ही आयुष्यभर सोबत राहा यासाठी शुभेच्छा. हा केवळ एक टप्पा आहे."
We understand it’s essential for you sir but unfortunately it doesn’t fall under our essentials or emergency categories!
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 22, 2021
Distance makes the heart grow fonder & currently, you healthier
P.S. We wish you lifetime together. This is just a phase. #StayHomeStaySafe https://t.co/5221kRAmHp
मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार कलम 144 नुसार मुंबई शहरात फक्त विशिष्ट कलर कोड असलेल्या गाड्यांनाच परवानगी दिली जाणार आहे. खासगी वाहनांसाठी हे तीन कलरचे कोड बंधनकारक करण्यात आले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहनांवर पिवळा कलर कोड असणार आहे. मेडिकल सेवा पुरवणाऱ्या वाहनांवर लाल कलरचा कोड असणार आहे आणि भाजीपाल्याच्या वाहनांवर हिरवा कलर कोड असणार आहे.