एक्स्प्लोर

बुरखा बंदी नको, याचं समर्थन महिला नेत्यांनी तरी करु नये; संजय राऊतांचं निलम गोऱ्हेंना 'रोखठोक' प्रत्युत्तर

संजय राऊत आणि निलम गोऱ्हे यांच्या भूमिकेवरुनंतर 'सामना'च्या अग्रलेखावरुन दोन मतप्रवाह निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.

मुंबई : शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून बुरखा आणि नकाब बंदीची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. सामनातील या अग्रलेखामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. मात्र बुरखा बंदीची मागणी शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी निलम गोऱ्हेंना रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेना पक्षाच्या भूमिका नेत्यांच्या बैठकीतून ठरत असतात. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्या अंतिमत: ठरतात. आजच्या सामनाच्या अग्रलेखातील भूमिका ना चर्चेतून आली, ना आदेशातून आली आहे. त्यामुळे कदाचित हे चालू घडामोडींवर वैयक्तिक मत असेल शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका नाही, असं निलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं.

संजय राऊत भूमिकेवर ठाम

बुरखा बंदीची मागणी शिवसेनेची नाहीच. श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्यानंतरची ती परखड भूमिका आहे. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा हीच भूमिका ठामपणे घेतली आहे. श्रीलंकेतील दहशतवादी हल्ला व तेथील सरकारने घेतलेल्या भूमिकेचा हे विश्लेषण आहे, असं ट्वीट करत संजय राऊतांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महिला नेत्यांनी मुस्लीम महिलांचे दुःख समजून घ्यावे. तिहेरी तलाकला विरोध आणि बुरखा बंदी नको, याचे समर्थन महिला नेत्यानी तरी करु नये, असं 'रोखठोक' प्रत्युत्तर संजय राऊतांनी निलम गोऱ्हे यांना दिलं आहे.

बुरखा बंदी नको, याचं समर्थन महिला नेत्यांनी तरी करु नये; संजय राऊतांचं निलम गोऱ्हेंना 'रोखठोक' प्रत्युत्तर

संजय राऊत आणि निलम गोऱ्हे यांच्या भूमिकेवरुनंतर 'सामना'च्या अग्रलेखावरुन दोन मतप्रवाह निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

साखळी स्फोटांनंतर श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल यांनी घेतलेल्या बुरखाबंदीच्या निर्णयाची री शिवसेनेने ओढली होती. 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेने श्रीलंकेप्रमाणेच भारतातही बुरखा आणि नकाबबंदी घालण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. मोदी अयोध्या दौऱ्यावर असल्याने रावणाच्या लंकेत जे घडलं ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? असा सवालही शिवसेनेने पंतप्रधान मोदींना केला.

फ्रान्समध्येही दहशतवादी हल्ला होताच तेथील सरकारने बुरखा बंदी केली. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात व ब्रिटनमध्येही हेच घडले आहे. मग याबाबतीत हिंदुस्थान मागे का? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

संबंधित बातम्या

रावणाच्या लंकेत जे घडलं ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार?, बुरखा बंदीवरुन शिवसेनेचा मोदींना सवाल

मोदींना हरवण्याची भाषा करणाऱ्या पोपट मास्तरांची कोलांटउडी, ओवेसींचा शिवसेनेवर बोचरा वार

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांच्या आयुष्यातही मुख्यमंत्री बनण्याची संधी आली होती पण... वळसे पाटलांनी दिला अजितदादांच्या आठवणींना उजाळा
अजितदादांच्या आयुष्यातही मुख्यमंत्री बनण्याची संधी आली होती पण... वळसे पाटलांनी दिला अजितदादांच्या आठवणींना उजाळा
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
नीट पेपरफुटी, ठाकरे बंधूंकडून मोर्चात एकत्र येण्याची तयारी; दुसरीकडे दंगलफेम अभिनेत्री आयशा खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं
नीट पेपरफुटी, ठाकरे बंधूंकडून मोर्चात एकत्र येण्याची तयारी; दुसरीकडे दंगलफेम अभिनेत्री आयशा खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं
सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, आदित्य ठाकरे आक्रमक, 24 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्रीत राष्ट्रगीत गायन करणार
सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, आदित्य ठाकरे आक्रमक, 24 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्रीत राष्ट्रगीत गायन करणार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget