एक्स्प्लोर

गेल्या 10 वर्षात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांचे निर्जंतुकीकरण झालेच नाही; धक्कादायक माहिती समोर

Water Mumbai Muncipal Corporation: सात तलाव आणि जलाशय मिळून मुंबईला शहराला दररोज एकूण 3.4 अब्ज लिटर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करतात.

Water Mumbai Muncipal Corporation मुंबई: गेल्या दहा वर्षांपासून मुख्य पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव आणि जलाशयांवर कोणतेही निर्जंतुकीकरण केले नसल्याचं माहिती अधिकारातून उघड झाली आहे . तसेच स्वत: महानगरपालिकेने याबाबत माहिती देत कबूलही केले आहे.

गेल्या दहा वर्षात अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मधली वैतरणा, भातसा, वेहार आणि तुळशी या तलावांमध्ये/जलाशयांमध्ये केलेल्या डिस्लिटिंगच्या कामाचा तपशील आणि या कामांवर खर्च झालेला पैसा याबाबत नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे पर्यावरण रक्षक बी. एन. कुमार यांनी माहिती मागितली होती. यामुळे ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महानगरपालिकेने काय उत्तर दिले?

सदर प्रकारावर महानगरपालिकेने माहिती देताना म्हटले आहे, या कार्यालयीन नोंदीनुसार, उपनगरांतर्गत मोडकसागर, तानसा आणि मध्य वैतरणा या तलावांमध्ये/जलाशयांमध्ये गाळ काढण्याचे कोणतेही काम झालेले नाही. कापूरबावडीतही गेल्या दहा वर्षांत गाळ काढण्याचे काम झालेलं नाही.  

नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे पर्यावरण रक्षक बी. एन. कुमार काय म्हणाले?

सात तलाव आणि जलाशय मिळून शहराला दररोज एकूण 3.4 अब्ज लिटर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करतात. पावसाळ्यात धरणे आणि तलाव ओसंडून वाहतात आणि तरीही उन्हाळ्यात शहराला पाणीकपातीला सामोरे जावे लागते. हा अनेक वर्षांचा अनुभव लक्षात घेऊन नॅटकनेक्टने आरटीआय अर्ज दाखल केला आहे. तलाव आणि जलाशयांच्या तळाशी गाळ साठल्याने साहजिकच दिशाभूल करणारी आकडेवारी समोर येते असं कुमार यांचे म्हणणं आहे. यामुळे शहर आणि उपनगरात कोट्यवधी रुपयांचे पाणी टँकर माफियाचे रॅकेट राज्य करत असल्याचे कुमार म्हणतात.

पावसाने मुंबईकरांची चिंता मिटवली-

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता जवळपास मिटल्यात जमा आहे. कारण, गेल्या आठवडाभरात मुंबईत झालेल्या पावसामुळे (Mumbai Rain) मुंबईला पाणीपुरवठा करणारे चार तलाव (Mumbai Lakes) ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे मुंबईत सध्याच्या घडीला लागू असलेली 10 टक्के पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. परिणामी पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या बहुतांश तलावांनी तळ गाठला होता. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने 10 टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. जून महिन्यात समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता कायम होती. मात्र, जुलै महिन्यात पावसाने ही सगळी कसर भरुन काढली.

संबंधित बातमी:

Mumbai Rain: मुसळधार पावसाने मुंबईकरांची चिंता मिटवली, चार तलाव ओसंडून वाहू लागले, सोमवारपासून पाणीकपात मागे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget