News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

दोनशेच्या नोटेसाठी ATM रिकॅलिब्रेशनचे आदेश, बँकांना खर्च....

दोनशेची नोट एटीएममधून वितरित व्हावी, यासाठी एटीएम रिकॅलिब्रेट करावी लागणार आहेत.

FOLLOW US: 
Share:
मुंबई: नोटाबंदीनंतर दोन हजाराच्या नोटेसाठी केलेल्या रिकॅलिब्रेशननंतर, आता पुन्हा एकदा बँकांना आपली एटीएम रिकॅलिब्रेट अर्थात करावी लागणार आहेत. दोनशेची नोट एटीएममधून वितरित व्हावी, यासाठी एटीएम रिकॅलिब्रेट करावी लागणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने तसे आदेश बँकांना दिले आहेत. पण या रिकॅलिब्रेशनसाठी बँकांना थोडाथोडका नव्हे तर तब्बल 1 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. जवळपास 2 लाख 20 हजार एटीएम रिकॅलिब्रेट करण्यासाठी 5 ते 6 महिने लागू शकतात. नोटाबंदी, थकीत कर्ज या आणि अन्य कारणांमुळे बँका आधीच अडचणीत असल्याचं सांगत आहेत. त्यात एटीएम रिकॅलिब्रेट करण्याचा खर्च बँकांना करावा लागणार आहे. सध्या एटीएममध्ये 100, 500 आणि 2 हजार रुपयांच्या नोटा मिळतात. मात्र नोटाबंदीनंतर दोनशेची नवी नोट बाजारात आली. या नोटेच्या रचनेमुळे ती नोट एटीएममध्ये मिळत नाही. ती केवळ बँकेतच मिळते. त्यामुळे ही नोटही एटीएममधून मिळावी, यासाठी एटीएमच्या रचनेत बदल करण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. दोन हजारऐवजी छोट्या-छोट्या नोटा चलनात आणण्याचा बँकांचा उद्देश आहे. त्यासाठीच आरबीआय हे पाऊल उचलत आहे.  दरम्यान, एटीएम रिकॅलिब्रेट करण्यासाठी बँकांना किमान 5 ते 6 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. नोटाबंदीनंतर एटीएममध्ये दोन हजारांच्या नोटा उपलब्ध झाल्याने, एटीएममधून पैसे काढण्याचं प्रमाण वाढलं आहे. दोनशेच्या नोटा एटीएममध्ये उपलब्ध झाल्याने ते प्रमाण कमी होईल, असा विश्वास आरबीआयला आहे. संबंधित बातम्या दोनशे रुपयांची नोट लवकरच चलनात, केंद्राची अधिसूचना 200 रुपयांची नोट चलनात आणण्याची तारीख ठरली!
Published at : 04 Jan 2018 08:33 AM (IST) Tags: RBI आरबीआय bank ATM एटीएम बँक

आणखी महत्वाच्या बातम्या

वृद्ध आजीची काळजी घेणाऱ्या मदतनीस महिलेनेच केली चोरी, तब्बल साडेतीन कोटींच्या दागिन्यांवर डल्ला

वृद्ध आजीची काळजी घेणाऱ्या मदतनीस महिलेनेच केली चोरी, तब्बल साडेतीन कोटींच्या दागिन्यांवर डल्ला

Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले

एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले

मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या

मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या

मराठा आरक्षण! राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर याचिकाकर्त्याने घेतला आक्षेप, सुनावणी 17 जानेवारीपर्यंत तहकूब

मराठा आरक्षण! राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर याचिकाकर्त्याने घेतला आक्षेप, सुनावणी 17 जानेवारीपर्यंत तहकूब

टॉप न्यूज़

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले

Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर

Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार

Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले

Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले